मोदी यांनी देशाचा फुटबॉल केला: लालूप्रसाद

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

पाटना (बिहार) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी ट्‌विटरद्वारे तीव्र टीका केली आहे. मोदी यांनी देशाचा फुटबॉल केला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

लालूप्रसाद यांनी म्हटले आहे की, "मोदी यांनी देशाला फुटबॉल केले आहे. ते एका बाजूला लाथ मारतात. तर दुसरे मंत्री दुसऱ्या बाजूला आणि तिसरे मंत्री तिसऱ्या बाजूला लाथ मारतात. रिझर्व्ह बॅंक आणि अर्थविभाग आपापल्या लाथा मारतात.' मोदी आत्ममग्न असल्याचे म्हणत "आत्ममग्नता आणि आत्मप्रसिद्धीच्या प्रतिमेतून बाहेर येऊन तुम्ही विवेकाने देशाला चालवा. गरीब जनतेला उध्वस्त करू नका' असा सल्लाही त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दलाची युती आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत आहेत. तर लालूप्रसाद यादव टीका करत आहेत.

नोटाबंदीचा निर्णय होऊन 37 दिवस उलटून गेल्यानंतरही गरीब नागरिक आणि शेतकरी त्रस्त असल्याबद्दल बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी चिंता व्यक्त केली आहे. सरकारने जप्त केलेला काळा पैसा गरीबांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: Modi treats country as football: Laluprasad