मोदींचा 7 जुलैला जयपूर दौरा 

पीटीआय
मंगळवार, 26 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 जुलै रोजी जयपूरला भेट देणार आहेत. या भेटीत पंतप्रधान सरकारी योजनांच्या लाभार्थींना भेटणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. 

जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 जुलै रोजी जयपूरला भेट देणार आहेत. या भेटीत पंतप्रधान सरकारी योजनांच्या लाभार्थींना भेटणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. 

चुरूमधून सात हजार लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी जयपूरला आणण्यात येणार असल्याचे संसदीय कामकाज राज्यमंत्री राजेंद्र राठोड म्हणाले. राठोड यांनी आज चुरू येथील तयारीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांच्या लाभार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमासाठी योग्य व्यवस्था करण्याची सूचनाही केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रसंगी चुरूचे जिल्हाधिकारी मुक्तानंद आगरवाल व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

Web Title: Modi visit to Jaipur on July 7