भाजप खासदार म्हणतात, मोदी काहीही करणार नाहीत

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

''नरेंद्र मोदी हे देशातील गरिब आणि दलित जनतेसाठी काहीही करणार नाहीत.''

 

नवी दिल्ली : भाजपचे खासदार प्रल्हाद जोशी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे हिंदीतील भाषण कन्नडमध्ये चुकीच्या पद्धतीने भाषांतर केले. यामध्ये त्यांनी म्हटले, की ''नरेंद्र मोदी हे देशातील गरिब आणि दलित जनतेसाठी काहीही करणार नाहीत.''

कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. मंगळवारी झालेल्या प्रचारसभेदरम्यान अमित शहा यांनी विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याऐवजी कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनाच सर्वांत भ्रष्टाचारी असे संबोधले होते. खुद्द अमित शहा यांनी हे विधान केल्यामुळे सोशल मीडियातून यावर मोठ्या प्रमाणात खिल्ली उडविण्यात येत आहे. 

त्यानंतर आता भाजपच्या खासदारांनी "नरेंद्र मोदी हे देशातील गरिब आणि दलित जनतेसाठी काहीही करणार नाहीत'', असे चुकीच्या पद्धतीने भाषांतर केल्याचे समोर आले आहे. तसेच ''कर्नाटकच्या विकासासाठी भाजप मदत करत नाही'', असे येडियुरप्पा यांनी म्हटल्याचेही भाषांतर खासदार जोशी यांनी केले. 

Web Title: Modi will not do anything to Poor Peoples and Dalit Peoples Amit Shah