Budget 2019 : 'मोदीजी, तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान केला'

Budget 2019 : 'मोदीजी, तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान केला'

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा अर्थसंकल्प आज (शुक्रवार) हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत सादर केला. त्यावर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की ''सरकारकडून 15 लोकांसाठी 3.5 लाख कोटींचे कर्जमाफ केले जाऊ शकते. मात्र, शेतकऱ्यांसाठी फक्त 17 रुपये प्रतिदिवस मदतीची घोषणा केली गेली. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान नाही तर काय आहे?''.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ''पंतप्रधानांनी राफेल, बेरोजगारी आणि नोटाबंदी यांसारख्या मुद्यांवर सर्जिकल स्ट्राईक होणार आहे, कारण आगामी निवडणूक याच मुद्यांवर लढविली जाणार आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या 6 हजार रुपये मदतीच्या आश्वासनावर ते म्हणाले, की सरकारकडून 15 लोकांसाठी 3.5 लाख कोटींचे कर्जमाफ केले जाऊ शकते. मात्र, शेतकऱ्यांसाठी फक्त 17 रुपये प्रतिदिवसाच्या मदतीची घोषणा केली. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांचा अपमान आहे''.  

तसेच काँग्रेसने आज विरोधी पक्षांतील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ईव्हीएमच्या कथित छेडछाडीवरही नेत्यांमध्ये चर्चा करण्यात आली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, राहुल गांधींनी बोलवलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव, बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्रा, द्रमुकच्या कनिमोळी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांच्यासह विविध नेतेमंडळी उपस्थित होती.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com