मोदींच्या प्रचारात द्वेष अन्‌ खोटेपणा; वायनाडमध्ये राहुल गांधींची टीका

वृत्तसंस्था
रविवार, 9 जून 2019

कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज वायनाड दौऱ्याच्या सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. मोदींची लोकसभा निवडणुकीची प्रचार मोहीम ही खोटेपणा, विष आणि द्वेषाने भरलेली होती असे सांगत आमच्या पक्षाने मात्र सत्य, प्रेम आणि जिव्हाळा यांच्या बाजूने उभे राहणे पसंत केल्याचे त्यांनी नमूद केले. 
 

वायनाड (केरळ) : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज वायनाड दौऱ्याच्या सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. मोदींची लोकसभा निवडणुकीची प्रचार मोहीम ही खोटेपणा, विष आणि द्वेषाने भरलेली होती असे सांगत आमच्या पक्षाने मात्र सत्य, प्रेम आणि जिव्हाळा यांच्या बाजूने उभे राहणे पसंत केल्याचे त्यांनी नमूद केले. 

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर राहुल हे प्रथमच केरळच्या दौऱ्यावर आले असून, कलपेट्टा येथे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कम्बालाकडू आणि पानामारम भागामध्ये त्यांनी रोड शोही केले. या वेळी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील "युनाटेड डेमोक्रॅटिक फ्रंट'च्या हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. राहुल यांच्यासमवेत या वेळी कॉंग्रेसचे कर्नाटक प्रभारी के. सी. वेणुगोपाल, केरळमधील विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथाला आणि केरळ कॉंग्रेसचे प्रमुख मुल्लापल्ली रामचंद्रन आदी नेते उपस्थित होते.

दरम्यान, याच भागामध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळल्याने सर्वत्र चिखल झाला होता; पण आजच्या राहुल यांच्या रोड शोवर याचा काहीही परिणाम झाला नाही. कम्बालाकडू येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""आपण एकत्रितपणे काम केल्यास वायनाडमधील समस्या सोडविल्या जाऊ शकतात. लोकसभेमध्ये वायनाडला सादर करणे ही माझी जबाबदारी असून येथे मला सर्व पक्षांच्या लोकांनी मदत केली. येथेही अनेक समस्या असून आपल्याला त्याचे निराकरण करावे लागेल.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modis Lok Sabha poll campaign filled with lies, poison and hatred says Rahul Gandhi