मोदींच्या नव्या मनुष्यबळ विकासमंत्र्यांची पदवी खोटी? वादाला सुरवात!

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जून 2019

इराणी यांच्याही पदवीचा मुद्दा झाला होता उपस्थित

एनडीए-1 सरकारमधील तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीवरूनही वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता त्याच खात्यातील नव्या मंत्र्यांचाही पदवीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2) सरकार स्थापन झाले. त्यानंतर काल (शुक्रवार) मोदी सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटप झाले. यामध्ये रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला. मात्र, कार्यभार स्विकारताच त्यांच्या पदवीचा मुद्दा आता उपस्थित करण्यात आला. 

रमेश निशंक यांच्या नावापुढे डॉक्टर असे लावले जात आहे. मात्र, त्यांची डॉक्टरेट ही पदवी बनावट असल्याचा आरोप केला जात आहे. रमेश निशंक यांना श्रीलंकेतील विद्यापीठाने दोन डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत. मात्र, निशंक यांच्याकडील या पदव्या देणारे संबंधित विद्यापीठ श्रीलंकेतील नोंदणीकृत नसल्याचे सांगण्यात येत आहे. 90 च्या दशकात कोलंबोतील मुक्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने निशंक यांना शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डी. लिटने सन्मानित केले होते.

इराणी यांच्याही पदवीचा मुद्दा झाला होता उपस्थित

एनडीए-1 सरकारमधील तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीवरूनही वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता त्याच खात्यातील नव्या मंत्र्यांचाही पदवीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modis new HRD Minister Ramesh Pokhriyal Degree is not Real