मोदींचे राजकारण टीआरपीसाठीः राहूल गांधी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नवी दिल्लीः काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रखर शब्दात हल्ला चढविला. 'पंतप्रधानांची सर्व धोरणे केवळ टीआरपीसाठी आहेत,' अशी टीका राहूल यांनी केली. 

सोनिया गांधी यांच्या अनुपस्थितीत राहूल यांनी काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक घेतली. त्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या निमित्ताने राहूल यांनी प्रथमच काँग्रेसच्या संसदीय पक्षाचे नेतृत्व केले आहे. 

'मोदी स्वतःच्याच प्रतिमेच्या पिंजऱयात अडकले आहेत आणि ते केवळ टीआरपीचे राजकारण करत आहेत,' असा आरोप राहूल यांनी केला. अध्यक्षस्थानावरून बोलताना ते म्हणाले, 'मोदींना केवळ टीआरपीच्या राजकारणात रस आहे. सगळीच धोरणे टीआरपी डोळ्यासमोर ठेवून आखणाऱया पंतप्रधानासाठी आमचा पक्ष देशाला वाऱयावर सोडणार नाही. स्वतःच्याच प्रतिमेत अडकलेला पंतप्रधान आमच्या पक्षाने कधीही देशाला दिलेला नाही.'

'संसदीय प्रथा मोडणारा पंतप्रधान आम्ही कधी देशाला दिलेला नाही. स्वतःच्या प्रतिमेसाठी भारतीय नागरीकांना असंख्य यातना होऊ देणारा पंतप्रधान आम्ही कधी देशाला दिलेला नाही,' अशी टीकाही राहूल यांनी केली.

काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीचे नेतृत्व सोनिया गांधी करतात. त्या प्रकृतीच्या कारणास्तव आजच्या बैठकीला गैरहजर होत्या. ताप आल्याने त्यांना बुधवारी सर गंगाराम रुग्णालयात दाखल केले होते. गुरूवारी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

Web Title: Modis politics only for TRP: Rahul Gandhi