मोदींच्या शब्दांना गानसम्राज्ञीच्या सुरांचे कोंदण !

Modis Word Sung by Singer Lata Mangeshkar
Modis Word Sung by Singer Lata Mangeshkar

नवी दिल्ली : आपल्या अजरामर गीतांनी जगभरातील संगीत रसिकांचा श्‍वास बनलेल्या भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "सौगंध मुझे इस मिट्टी की... मैं देश नहीं झुकने दूँगा,' एका काव्यपंक्तींला स्वरसाज चढविला आहे. 90 वर्षांच्या लताबाईंनी आज स्वतःच ट्विट करून ही आनंदवार्ता जगाला सांगितली. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी देशाला ज्या शब्दांत आश्‍वस्त केले त्याच ओळींना लताबाईंनी आपल्या दैवी स्वरांचे कोंदण बहाल केले आहे. 

माजी पंतप्रधान टलबिहारी वाजपेयी यांच्याही काही गीतांना लताबाईंनी स्वरसाज दिला होता. त्यानंतर त्यांनी ज्यांच्या कविता गायल्या असे मोदी हे दुसरेच पंतप्रधान ठरले आहेत. हे गीत गाण्यापूर्वी लता मंगेशकर यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली होती, असे ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी 'सकाळ'ला सांगितले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लताबाई आज बोलू शकल्या नाहीत; मात्र उषाताईंनी या गीताच्या ध्वनिमुद्रणापूर्वी लताबाई व पंतप्रधानांची चर्चा झाल्याचे नमूद केले. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर व सर्जिकल स्ट्राइकपूर्वी मोदींनी 'मैं देश नहीं मिटने दूँगा,' असा दुर्दम्य विश्‍वास व्यक्त केला होता. ते शब्द लताबाईंना आवडले व त्यांनी ते गाण्याचे ठरविले. त्यानंतर अलीकडेच त्याचे रेकॉर्डिंग पार पडले. या तीन-चार ओळींच्याच गीताला वंदे मातरमचा कोरस आहे. लताबाईंनी याबाबत आज ट्विट करून ही ध्वनिचित्र लिंकही शेअर केली. यात त्यांचा आवाज ऐकू येतो.

लताबाई म्हणतात, "नमस्कार! काही दिवसांपूर्वी भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे एक भाषण मी ऐकत होते. त्यांनी एका कवितेच्या काही ओळी उधृत केल्या. त्या मला प्रत्येक भारतीयाची "मन की बात' वाटली. त्या काव्यपंक्ती माझ्या मनाला स्पर्शून गेल्या. त्याच मी गीताच्या रूपात ध्वनिमुद्रित केल्या असून, आज मी या ओळी आमच्या देशाचे वीर जवान व जनतेला समर्पित करते आहे.'' 

स्वतः पंतप्रधानांनीही लता मंगेशकर यांच्या आवाजातील हा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यानंतर काही मिनिटांतच लाखो जणांनी तो पाहिला. 'हृदयाच्या गाभ्यातून निघालेल्या या गीताच्या रूपाने मिळालेला तुमचा स्नेह व आशीर्वाद माझा प्रेरणास्रोत आहे,' अशा शब्दांत मोदींनी लतादीदींबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

ऐका लतादिदींच्या आवाजातील  'मैं देश नहीं मिटने दूँगा'... 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com