‘फोटो वॉर’मधून अन्सार भाजप कार्यकर्ता असल्याचा आपचा दावा

Mohammad Ansar is a BJP worker?
Mohammad Ansar is a BJP worker?Mohammad Ansar is a BJP worker?

दिल्लीतील जहांगीरपुरी येथील हिंसाचाराचा कथित सूत्रधार मोहम्मद अन्सारवरून (Mohammad Ansar) राजकीय पक्षांमध्ये फोटोयुद्ध सुरू झाले आहे. कालपर्यंत आपचा कार्यकर्ता म्हणून वर्णी लागलेल्या अन्सारचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो समोर आले आहेत. आपचे आमदार आतिशी यांनी मंगळवारी (ता. १९) अन्सारचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. (Mohammad Ansar is a BJP worker?)

दिल्ली भाजपच्या (BJP) नेत्यांनी सोमवारी जहांगीरपुरी हिंसाचारातील आरोपी मोहम्मद अन्सार आणि दिल्लीतील सत्ताधारी आप यांच्यात संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच पोलिसांनी दंगलीचा मास्टरमाईंड कोणत्या विशिष्ट पक्षासोबत जुळला आहे याचा तपास केला पाहिजे, असे म्हटले होते. दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून अन्सारची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती.

Mohammad Ansar is a BJP worker?
Amravati Case : यशोमती ठाकूर यांचे अनिल बोंडेंना उत्तर; तुम्ही ना...

दिल्लीच्या जनतेला आप नेतृत्वाकडून उत्तर हवे आहे. यापूर्वी देखील २०२० च्या दिल्ली दंगलीत आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसैन यांना मुख्य आरोपी म्हणून पाहिले होते. भाजपच्या (BJP) आरोपांवर आपचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी पत्रकारांना सांगितले की, मला वाटते की अन्सार निश्चितपणे भाजपशी जोडला गेला पाहिजे. कारण, भगवा पक्षाला आतली गोष्ट माहीत आहे.

भाजप हा गुंडांचा पक्ष

‘जहांगीरपुरी दंगलीचा मुख्य आरोपी अन्सार (Mohammad Ansar) हा भाजपचा (BJP) नेता आहे. भाजपच्या उमेदवार संगीता बजाज यांना उमेदवारी मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. भाजपमध्ये सक्रिय भूमिका घेतल्याने भाजपने दंगल घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने दिल्लीतील जनतेची माफी मागावी. भाजप हा गुंडांचा पक्ष आहे’ असे ट्विट आतिशी यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण?

हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दगडफेकीनंतर दोन समुदायांच्या लोकांमध्ये हिंसाचार झाला होता. ज्यामध्ये एक नागरिक आणि आठ पोलिस जखमी झाले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही समुदायातील २४ जणांना अटक केली आहेत. तसेच दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com