Telangana Revanth Reddy Cabinet: तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारचा मोठा निर्णय! भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारास केलं मंत्री

Telangana CM Revanth Reddy appoints former Indian cricket captain Mohammad Azharuddin as minister : जाणून घ्या, मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी नेमकं कुणाची मंत्रिपदावर वर्णी लावली आहे?
CM  Revanth Reddy

CM  Revanth Reddy

esakal

Updated on

Mohammad Azharuddin Joins Telangana Cabinet : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळात आज(शुक्रवार) मोहम्मद अझरुद्दीन यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली. तेलंगणा राजभवन येथे झालेल्या समारंभात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी मुख्यमंत्र्यांसह अनेक प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना मंत्रिपदाची शपथ दिली.

अझरुद्दीन यांच्या समावेशामुळे एकूण मंत्रिमंडळाची एकूण सदस्य संख्या आता १६ झाली आहे. तसेच यामध्ये आणखी दोन सदस्यांचा समावेश होवू शकतो. तेलंगणा विधानसभेच्या सदस्यांच्या संख्येनुसार, १८ मंत्री असू शकतात.

CM  Revanth Reddy
Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

गेल्या आठवड्यात ऑगस्टमध्ये, तेलंगणा सरकारने अझरुद्दीन यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेचे (एमएलसी) सदस्य म्हणून नामांकित केले होते. तथापि, राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी अद्याप नियुक्तीला मान्यता दिलेली नाही. अझरुद्दीन यांनी २०२३ च्या ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com