

Election Commission of Maharashtra increases candidate spending limits for local body elections after eight years, easing campaign expenses.
esakal
Increase in Candidate Spending Limit for Local Elections : राज्यात सध्या सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. तर इच्छुक उमेदवारही त्यादृष्टीने कंबर कसून तयारीला लागले आहेत. दरम्यान आता आठ वर्षांनंतर, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या खर्च मर्यादेत मोठा बदल केला आहे.
आयोगाने गुरुवारी जाहीर केले की मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या अ-वर्ग महानगरपालिकांमधील उमेदवार आता जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत खर्च करू शकतील. आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन ही सुधारणा करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या मते, अ-वर्ग श्रेणीत येणाऱ्या मुंबई, पुणे आणि नागपूरमधील उमेदवारांसाठी निवडणूक खर्च मर्यादा १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाणे सारख्या ब-वर्ग महानगरपालिकांसाठी ही मर्यादा १३ लाख निश्चित करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि वसई-विरार सारख्या क-वर्ग महानगरपालिकांमधील उमेदवार आता ११ लाखांपर्यंत खर्च करू शकतील. तर, उर्वरित १९ ड-वर्ग महानगरपालिकांसाठी ही मर्यादा ९ लाख निश्चित करण्यात आली आहे. आयोगाच्या मते, २०१७ नंतर पहिल्यांदाच ही सुधारणा करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.