Mohan Bhagwat’s Sharp Critique: Education and Healthcare Slip Beyond Common Man’s Reach : शिक्षण आणि आरोग्य सेवा सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असल्याचे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सरकारचे कान टोचले आहेत. या दोन्ही क्षेत्रांचे व्यापारीकरण झाल्याचे नमूद करत त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. रविवारी इंदूर येथील कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले.