RSS 100th Anniversary : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आपल्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात कार्यक्रमांची मालिका आयोजित करत आहे. या कार्यक्रमांची सुरुवात मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे झाली. या मालिकेतील हा पहिला कार्यक्रम होता, ज्यामध्ये संघप्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी समाजातील विविध घटकांसह परदेशी प्रतिनिधींशी संवाद साधला.