esakal | निपाह व्हायरसला शोधणारं किट मंजूर; एका तासाच्या आत मिळणार निष्कर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

निपाह व्हायरसला शोधणारं किट मंजूर; एका तासाच्या आत मिळणार निष्कर्ष

निपाह व्हायरसला शोधणारं किट मंजूर; एका तासाच्या आत मिळणार निष्कर्ष

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कोरोनानंतर निपाह व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या चिंतेचं वातावरण आहे. या दरम्यानच या व्हायरसशी लढण्यासाठी एक मोठं हत्यार मिळालं आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आता निपाह व्हायरसच्या तपासणीसाठी गोव्याच्या मोल्बियो डायग्नोस्टिकच्या टेस्ट किटला मंजूरी दिली आहे. आपत्कालीन वापरासाठीची ही मंजूरी असणार आहे. ट्रुनेट नावाचे हे टेस्ट किट आरटीपीसीआर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. निपाह व्हायरसच्या तपासणीसाठी परवानगी मिळालेले भारतातील हे पहिलेच कीट टेस्ट कीट आहे.

हेही वाचा: ममतांविरोधात भाजपचे 'महिला कार्ड'; भवानीपूरमध्ये उमेदवाराची घोषणा

स्वदेशी आणि पोर्टेबल किट

ट्रुनेट हे पूर्णपणे स्वदेशी, बॅटरीच्या माध्यमातून चालणारे आणि आरटीपीसीआर प्लॅटफॉर्मवर आधारित किट आहे. या माध्यमातून जवळपास 30 आजारांची तपासणी केली जाऊ शकते. तसेच एका तासाच्या आतच या टेस्टचे निष्कर्ष समोर येऊ शकतात. या किटच्या माध्यमातून टीबी, कोरोना, डेंग्यू, चिकनगुणिया, हिप्पॅटायटीस, एचपीवीसारख्या आजारांची तपासणी केली जाऊ शकते.

हेही वाचा: शत्रुच्या हवाई हल्ल्याआधीच मिळणार माहिती, DRDO IAF साठी बनवणार खास जेट

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये देखील पेटंट

मोल्बियोचे प्रमुख चंद्रशेखर नायर यांनी सांगितलं की या टेस्ट किटला ब्रिफकेसमध्ये ठेवून ने-आण केली जाऊ शकते. हे टेस्ट किट आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये नेलं असून प्रत्येक ठिकाणी पेटंट केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलंय की, या किटला या प्रकारे डिझाईन केलं गेलंय की कमीतकमी वेळात प्रशिक्षणानंतर ते वापरात आणलं जाऊ शकतं.

केरळमध्ये कोझिकोडशिवाय भारतात देखील निपाह व्हायरसची तीन प्रकरणे याआधीच समोर आली आहेत. सर्वांत आधी 2001 मध्ये सिलीगुडीमध्ये हा व्हायरस सापडला होता. त्यानंतर 2007 मध्ये पश्चिम बंगाल आणि केरळमधील कोझिकोड आमि मल्लपुरममध्ये 2018 मध्ये या व्हायरसचं संक्रमण आढळून आलं होतं.

loading image
go to top