esakal | ममतांविरोधात भाजपचे 'महिला कार्ड'; भवानीपूरमध्ये उमेदवाराची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

ममतांविरोधात भाजपचे 'महिला कार्ड'; भवानीपूरमध्ये उमेदवाराची घोषणा

तृणमूल नेत्यानेच या महिला उमेदवाराचा मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता.

ममतांविरोधात भाजपचे 'महिला कार्ड'; भवानीपूरमध्ये उमेदवाराची घोषणा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. आता भाजपकडून यासाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील पोटनिवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे कारण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूरमधून रिंगणात उतरणार आहेत. मुख्यमंत्रीपद कायम ठेवायचे असेल तर त्यांना विधानसभेचे सदस्यत्व गरजेचे आहे. भवानीपूरमध्ये ममतांविरोधात भाजपने महिला उमेदवाराचे नाव जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे तृणमूल नेत्यानेच या महिला उमेदवाराचा मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. ममता बॅनर्जींविरोधात प्रियांका टिबरीवाल या भवानीपूर मतदारसंघात लढणार आहेत.

ममता बॅनर्जींना मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. मे महिन्यात झालेल्या विधनासभा निवडणुकीत त्यांना नंदीग्राम मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र राज्यात बहुमत मिळाल्यानं त्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या आहेत. सहा महिन्याच्या आत त्यांना आमदार होणं गरजेचं आहे.

हेही वाचा: बाहुबलींना स्थान नाही; मुख्तार अन्सारींना दणका देत मायावतींचा मोठा निर्णय

भाजपने ट्विटरवरून उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये भवानीपूरमध्ये प्रियांका टिबरीवाल यांच्याशिवाय जंगीपूरमधून सुजित दास आणि समशेरगंजमध्ये मिलन घोष यांना उमेदवारी दिली आहे. प्रियांका टिबरीवाल या भाजप नेते बाबुल सुप्रियो यांची कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होत्या. त्यांनी २०१४ मध्ये भाजप प्रवेश केला होता. नरेंद्र मोदींना आदर्श मानून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

भाजप खासदार बाबुल सुप्रिया यांच्या सल्ल्यानंतरच प्रियंका भाजपमध्ये आल्या होत्या. त्यानंतर नगपरिषदेची निवडणूक त्यांनी लढवली पण पराभव पत्करावा लागली होती. भाजपने त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. २०२१ च्या निवडणुकीत तृणमूलच्याच उमेदवाराकडून प्रियंका टिबरीवाल यांचा पराभव झाला आहे.

loading image
go to top