माकडानेच मारले बाळाला, कुटूंबियांचा आरोप

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

घरात मच्छरदाणीमध्ये बाळाला झोपवले असता, एक माकड घरात शिरून त्याने बाळाला उचलून पोबारा केला. या बाळाला घेऊन तो, घराच्या बाहेर पळून गेला. हा सर्व प्रकार बाळाच्या आईच्या डोळ्यासमोर घडला, पण ती काहीच करू शकली नाही. आईने आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे हे माकड आणखीनच दूर पळून गेले.

ओडिशा : येथील बंकी या गावात नवजात बालकाला माकडाने उचलून नेले होते. बालकाला मृतावस्थेत बघितल्यानंतर या बालकाच्या आई-वडिलांनी आपले मूल त्या माकडाने मारून टाकल्याचा आरोप केला आहे. हे बालक काही दिवसांचेच होते. 

घरात मच्छरदाणीमध्ये बाळाला झोपवले असता, एक माकड घरात शिरून त्याने बाळाला उचलून पोबारा केला. या बाळाला घेऊन तो, घराच्या बाहेर पळून गेला. हा सर्व प्रकार बाळाच्या आईच्या डोळ्यासमोर घडला, पण ती काहीच करू शकली नाही. आईने आरडा-ओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे हे माकड आणखीनच दूर पळून गेले.

रविवारी दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर हे बाळ घराजवळील विहिरीतच मृतावस्थेत सापडले. माकडाने बाळाला उचलून नेताना ते त्याच्या हातातून घसरून विहिरीत पडल्याचा अंदाज पोलिस व्यक्त करीत आहेत. तसेच बाळाचे वडिल, राम कृष्ण नायाक यांनीही बाळाला उचलून उड्या मारत असताना माकडाच्या हातून ते, विहिरीत पडल्याचे सांगितले.   

या अशा घटना फार कधीतरी होतात, सामान्यतः माकडे ही लोकांच्या उघड्यावर ठेवलेल्या सामानाचे नुकसान करतात. माणसांना त्रास देण्याचे प्रकार कधीतरीच घडतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.   

माकडे ही घरात खाण्याच्या शोधात शिरतात, पण ही पहिलीच घटना आहे ज्यात माकडाने बाळाला उचलून नेले आहे. असे पोलिस अधिकारी प्रधान यांनी माध्यमांना सांगितले. बाळाच्या अंगावर जखमा नव्हत्या, त्याला माकडाने थेट विहिरीत टाकले असल्याचे कळते.  

Web Title: monkey kills baby, claimed by family

टॅग्स