esakal | VIDEO : दिल्ली विमानतळाचा माकडानं घेतला ताबा; 'फूड प्लाझा'त घातला धुमाकूळ I Delhi IGI Airport
sakal

बोलून बातमी शोधा

Monkey

माकडांचा उच्छाद आपल्याला नवा नाही. मंदिर परिसरात तर माकडांचा वावर नेहमीचाच असतो.

VIDEO : दिल्ली विमानतळाचा माकडानं घेतला ताबा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

दिल्ली : माकडांचा उच्छाद आपल्याला नवा नाही. मंदिर परिसरात तर माकडांचा वावर नेहमीचाच असतो. पण, कधी विमानतळात माकड शिरलेलं ऐकलंय. नाही ना? पण, एक वानर चक्क दिल्लीतील (Monkey) इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळात (Delhi Indira Gandhi International Airport) शिरलं अन् त्यानं तिथं जंगी पार्टी केलीय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या वानराच्या मर्कट लीला पाहून अनेकांनी या व्हिडिओला लाइक, कमेंट्सह भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आयजीआय एअरपोर्टवरील (IGI Airport) प्रीमिअम लाऊंजमध्ये हे माकड शिरलं. या व्हिडिओत पाहू शकता माकड फूड प्लाझाच्या काऊंटवर ऐटीत बसलेलं आहे. तिथं ते वेगवेगळे पदार्थ चाखताना दिसतंय. एक ज्युसची बाटली तो खाली पाडतो आणि त्यातील ज्युसचा मस्त आस्वाद घेताना दिसतंय. त्यानंतर ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उड्या मारताना दिसतं. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरलं होतोय. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एक माकड एका विश्रामगृहात शिरलं. हा व्हिडिओ शूट करणारे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे सहाय्यक महाव्यवस्थापक नामदेव कदम (Namdev Kadam) म्हणाले, मी नाश्ता विकत घेत होतो आणि अचानक, मी पाहिलं की बरेच लोक फोटो काढत होते. मला वाटलं, कोणी सेलिब्रिटी असतील, ज्याचे लोक फोटो काढत आहेत. जेव्हा मी आजूबाजूला पाहिलं, तेव्हा मला काउंटरवर एक माकड ज्यूसचं पॅकेट उघडण्याचा प्रयत्न करताना दिसलं आणि त्याच्या या मर्कट लीलेचा मीही व्हिडिओ घेतला, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

या वानराला विमानतळावर पाहून तेथील नागरिकांना धक्का बसला. सर्वजण त्याला घाबरून त्याच्यापासून दूर जाऊ लागले. भीतीनं कुणी त्याला हाकलण्याचा प्रयत्नही करत नाही. पण, सर्वांनी माकडाचे हे माकडचाळे आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेत. माकड थोडा वेळ इथं तिथं उड्या मारतं आणि नंतर स्वतःच तिथून निघून जातं. कदाचित, हे माकड भुकेलं होतं आणि खाण्याच्या शोधातच ते विमानतळावर आलं होतं. खाऊन-पिऊन झाल्यानंतर तो तिथून गेला, सुदैवाने त्याला कुणालाही हानी पोहोचवली नाही. या विमानतळावर माकड घुसण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी 2018 सालीसुद्धा याच एअरपोर्टवरील माकडाचा असा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

हेही वाचा: Success Story : निरक्षर दांपत्याचा मुलगा बनला 'CA'

loading image
go to top