Monkeypox Outbreak | केरळमध्ये मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

monkeypox suspected patient death

Monkeypox Outbreak | केरळमध्ये मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाचा मृत्यू

Monkeypox Suspected Death : केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून हा तरुण 10 दिवसांपूर्वी यूएईहून परतला होता. तेव्हापासून तरुणाची प्रकृती ढासळत चालली होती. तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान तरुणाला मंकीपॉक्स असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र यामु

मृत रुग्णाच्या स्वॅबचे नमुने शनिवारी अलाप्पुझा येथील ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी रविवारी सांगितले की, 22 वर्षीय तरुणाच्या मृत्यूच्या कारणाची चौकशी केली जाईल, जो नुकताच संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधून परतला होता आणि त्याला मंकीपॉक्सची लागण झाली होती. त्यांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. रुग्ण तरुण असून त्याला इतर कोणताही आजार किंवा आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती, त्यामुळे आरोग्य विभाग त्याच्या मृत्यूचे कारण शोधत आहे.

21 जुलै रोजी भारतात पोहोचलेला हा रुग्ण आपल्या कुटुंबासोबत राहत होता आणि त्याला 27 जुलै रोजीच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उशिरा का उपचार केले, याची सखोल चौकशी केली जाईल, असे केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान केरळ सरकार पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) कडून याबद्दलच्या रिपोर्टची वाट पाहत आहे. देशात मंकीपॉक्सच्या प्रकरणांमुळे सरकारचा ताण वाढला आहे. आतापर्यंत केरळ, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये मंकीपॉक्सचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. 14 जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोसिस (प्राण्यांमधून मानवांमध्ये पसरलेला विषाणू) आहे, ज्याची लक्षणे स्मॉलपॉक्सच्या रूग्णांमध्ये दिसल्यासारखीच आहेत, जरी ती वैद्यकीयदृष्ट्या कमी गंभीर आहे.

टॅग्स :Monkeypox