Sanjay Raut ED Raid : संजय राऊतांच्या घरातून साडेअकरा लाख रुपये जप्त!

ED seizes Rs 11.50 lakh cash from Shivsena leader Sanjay Raut residence
ED seizes Rs 11.50 lakh cash from Shivsena leader Sanjay Raut residence esakal

मुंबई : ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर आज छापा टाकला. ईडीच्या या कारवाईनंतर आज सकाळपासून संजय राऊतांची चौकशी केली जात असून त्यांना त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईत राऊतांच्या घरातून साडे अकरा लाख रुपयांची रोकड ईडीने जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.

या दरम्यान सध्या ईडी कार्यालयात संजय राऊत यांची चौकशी करण्यात येत आहे. तसेच या रकमेबद्दल संजय राऊत यांच्याकडून माहिती घेण्यात येत आहे. त्यांच्या रहात्या घरातून ही रक्कम जप्त करण्यात आली असून ही रोख रक्कम हे त्यांच्या अकाउंटमधून इतर कामांसाठी पैसे काढल्याचे संजय राऊतांकडून सांगण्यात आले आहे. याची शहानिशा करण्यासाठी ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या बँक खात्यातून ही रक्कम काढल्याचे तपासातून समोर आल्यास त्यांना हे पैसे परत करण्यात येतील. अन्यथा त्यांना या रकमेबद्दल देखील प्रश्न विचारले जातील.

ED seizes Rs 11.50 lakh cash from Shivsena leader Sanjay Raut residence
'मैत्री' बंगल्यावरील ED कारवाईदरम्यान काय झालं? सुनिल राऊतांनी दिली माहिती

ई़डीने राऊतांना ताब्यात घेतले असता त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत लोकांना मारहाण करून खोटे पुरावे तयार केले जात आहेत. हे सर्व प्रयत्न महाराष्ट्राला, शिवसेनेला कमकुवत करण्यासाठी केले जात आहे शिवसेनेला त्रास देण्यासाठी, महाराष्ट्राला कमकुवत करण्यासाठी हे सर्व दमनचक्र आणि दहशत सुरू आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू असे राऊत म्हणाले आहेत.

ED seizes Rs 11.50 lakh cash from Shivsena leader Sanjay Raut residence
सॅमसंग गॅलक्सी Z Fold 4 अन् Flip 4 ची प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com