कोरोनानंतर देशावर आता 'मंकीपॉक्स'चं संकट; केरळ, दिल्लीनंतर हिमाचलमध्ये आढळला संशयित रुग्ण

आता भारतातही मंकीपॉक्सची प्रकरणं समोर येऊ लागली आहेत.
Monkeypox Virus News
Monkeypox Virus News esakal
Summary

आता भारतातही मंकीपॉक्सची प्रकरणं समोर येऊ लागली आहेत.

Monkeypox Virus News : कोरोना व्हायरसचं (Coronavirus) संकट कमी होताच जगभरातील आरोग्य यंत्रणांना आता मंकीपॉक्समुळं (Monkeypox) धडकी भरतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) मते, आतापर्यंत 78 देशांतील 18000 पेक्षा जास्त नागरिकांना मंकीपॉक्सचा संसर्ग झालाय.

WHO नं मंकीपॉक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलीय. या व्हायरसचा संसर्ग झाल्यास ताप, डोकेदुखी, शरीरावर व्रण येणे अशी सामान्य लक्षणं दिसून येत आहे. तसं तर हा विषाणू फार जुना आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत या विषाणूग्रस्तांची संख्या अचानक वाढताना दिसून येत आहे. बहुतांश रुग्णांमध्येवरील तीन प्रमुख लक्षणंच आढळली आहेत.

Monkeypox Virus News
Monkeypox Virus : मंकीपॉक्सचा धोका वाढला; स्पेनमध्ये मृत्यूची पहिली नोंद

आता भारतातही मंकीपॉक्सची (Monkeypox Virus) प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. वाढत्या केसेसमुळं आता लोक घाबरत आहेत. दरम्यान, हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळं आरोग्य विभागात खळबळ उडालीय. मंकीपॉक्सची पुष्टी करण्यासाठी त्या व्यक्तीचा नमुना (रिपोर्ट) पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय. आरोग्य विभागानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिलीय.

Monkeypox Virus News
पुन्हा धोका वाढतोय! देशात 24 तासांत आढळले 20,408 नवे रुग्ण; 54 जणांचा मृत्यू

संशयित व्यक्ती हिमाचलमधील बद्दी भागातील रहिवासी आहे. 21 दिवसांपूर्वी त्या व्यक्तीला संसर्गाची लक्षणं दिसली. मात्र, तरीही तो बरा होत आहे. खबरदारी म्हणून त्या व्यक्तीला विलगीकरणात ठेवण्यात आलं असून आजूबाजूच्या परिसरात पाळत ठेवली जात असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय. 27 जुलै रोजी देशात मंकीपॉक्सच्या चार प्रकरणांची पुष्टी झालीय. त्यापैकी तीन केरळ आणि एक दिल्लीतून आलेला आहे. केंद्र सरकारनं शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com