मॉन्सून येतोय वेगाने; अरबी समुद्रात चाल

Monsoon
Monsoon

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. ३) अरबी समुद्राच्या दक्षिण भागात चाल केली आहे. मालदीव बेटे आणि कोमोरीन भाग, तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने प्रगती केल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

विषुववत्ताकडून येणारे वाऱ्याचे प्रवाह, तसेच या भागात असलेले ढगांचे अच्छादन यावरून वाऱ्यांनी प्रगती केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

गुरूवारी (ता. ३०) मॉन्सूने संपुर्ण अंदमान बेटांचा परिसर व्यापला. तर अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे असलेल्या मालदीव बेटे आणि लगतच्या कोमोरीन भागापर्यंत मॉन्सून दाखल झाला होता. बुधवारी (ता.५) दक्षिण भारतात वाऱ्यांचे पुर्व-पश्चिम जोडक्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यानंतर मॉन्सूनच्या केरळातील आगमनासाठी पोषक हवामान होईल. यंदा मॉन्सून ६ जून रोजी केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने यापुर्वीच दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com