

India faces a severe monsoon deficit
esakal
Agriculture Contingency Plans: देशावर 'अल निनो'चे संकट घोंगावू लागले असून मान्सूनचा वेगही कमालीचा मंदावला आहे. देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील १२ राज्यांतील तब्बल ३१५ जिल्ह्यांमध्ये यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.