Monsoon Delay India : चिंता वाढली ! मान्सून आता केरळमध्ये ४ जूनला पोहोचणार, महाराष्ट्रात आगमन कधी? हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर
Kerala Monsoon Update : केरळमध्ये मान्सून २६ मेऐवजी आता ३–४ जूनदरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन “मृदू” असून सुरुवातीची गती कमी राहणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भात उष्णतेची लाट कायम असून तापमान ४६–४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे.
देशभरातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनचा वेग अचानक मंदावला आहे.अंदमान समुद्रात नियोजित वेळेपूर्वीच दाखल झालेला आणि श्रीलंकेपर्यंत मजल मारलेला हा मान्सून, भारताच्या अगदी सीमेजवळ पोहोचताच रेंगाळला आहे. मात्र याचे कारण समोर आले आहे.