यंदा मॉन्सूनचं वेळेत आगमन, १ जून रोजी केरळमध्ये होणार दाखल

केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सचिवांची माहिती
Rain
Rainesakal

नवी दिल्ली : यंदा मॉन्सूनचं सर्वसाधारण निश्चित वेळेत आगमन होणार आहे. त्यानुसार, नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये १ जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने गुरुवारी याबाबत माहिती दिली. पण याबाबतचं अधिकृत मॉन्सून पूर्वानुमान (फोअरकास्ट) १५ मे रोजी जाहीर करण्यात येईल, असं पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी सांगितलं.

सचिव राजीवन ट्वीट करुन म्हणाले, "भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) विस्तृत पूर्वानुमानानुसार, केरळमध्ये १ जून रोजी मॉन्सून दाखल होईल. याबाबत १५ मे रोजी अधिकृत पूर्वानुमान जाहीर केलं जाईल."

Rain
धक्कादायक! मुंबईतून २१ कोटीचे युरेनियम जप्त

दरम्यान, आयएमडीनं नुकतंच म्हटलं होतं की, नैऋत्य मोसमी वारे भारतात ७५ टक्के पावसासाठी कारणीभूत असतात. या वाऱ्यांचं यंदाच्या वर्षात सर्वसाधारण काळात आगमन होणार आहे. आयएमडीनं गेल्या महिन्यांत जाहीर केलेल्या पूर्वानुमानानुसार यंदा सरासरी ९८ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये ५ टक्के अधिक किंवा कमी पाऊस होऊ शकतो.

देशात सध्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रातील लोक हवालदिल झाले आहेत. मात्र, पाऊस वेळेवर येणार असल्याच्या अंदाजामुळे शेतकरी वर्गासाठी ही सुखावणारी गोष्ट ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com