विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा : मोदी

Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली : लोकशाहीत विरोधकांची ताकद महत्त्वाची असते. यंदा विरोधी पक्षाने निवडणुकीत मिळालेल्या आकड्याचा विचार न करता लोकहिताच्या कामात सहभागी व्हावे. विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मागील पाच वर्षांत संसदेत अनेक देशहिताचे निर्णय झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (सोमवार) सुरवात होत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. भाजपने 300 हून अधिक जागा जिंकून निवडणुकीत वर्चस्व मिळविले होते. काँग्रेसला 52 जागाच मिळाल्याने यंदाही त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद असणार नाही. तरीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपविरोधात इंच-इंच लढाई लढू असे म्हटले होते. आता आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात सर्व पक्षांची कसोटी लागणार आहे. नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होणार असून, भाजप खासदार विरेंद्र कुमार यांची हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी मोदी म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदान झाले. महिलांचा मतदानात मोठा वाटा होता. अनेक वर्षांनंतर एका सरकारला पूर्ण बहुमताने निवडून दिले आहे. जनतेने आम्हाला संधी दिली आहे. पाच वर्षांचा आम्हाला अनुभव आहे. संसदेचे कामकाज चांगल्या वातावरणात झालेले आहे. त्यामध्ये देशहिताचे निर्णय़ झालेले आहे. यंदाही सर्व पक्ष जनहिताच्या निर्णयासाठी चर्चेत सहभागी होती. सबका साथ, सबका विकास याच्या माध्यमातून आम्ही आमचा प्रवास सुरु केला होता. जनतेने यावर विश्वास दाखविलेला आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष सक्रीय असणे, मजबूत असणे गरजेचे आहे. मला आशा आहे, की विरोधी पक्षाने निवडणुकीत मिळालेला आकडा सोडून आमच्यासाठी त्यांच्या सर्व भावना महत्त्वाच्या आहेत. आम्ही निष्पक्ष भावाने जनतेच्या कल्याणासाठी काम करत राहू. या अधिवेशनात आपण सर्वजण एकत्र मिळून पुढे जाऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com