विरोधक संसदेचं काम होऊ देईनात, त्यांचा खरा चेहरा समोर आणा - PM मोदी

PM Modi
PM ModiFile photo
Summary

काँग्रेस आणि विरोधकांच्या या कारनाम्यांना जनतेसमोर उघडं पाडा असं पंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना सांगितलं आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक घेतली. यावेळी संसदेच्या कामकाजात काँग्रेस अडथळा आणत असल्याचा आरोप मोदींनी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस संसदेचं कामकाज आणि चर्चा दोन्ही होऊ देत नाही. काँग्रेसकडून बैठकांवर बहिष्कार टाकला जात आहे. कोरोनावर बैठक बोलावली त्यावर बहिष्कार टाकला आणि इतर पक्षांनाही त्यात सहभागी होण्यापासून थांबवलं असंही मोदींनी म्हटलं.

काँग्रेस आणि विरोधकांच्या या कारनाम्यांना जनतेसमोर उघडं पाडा असं पंतप्रधान मोदींनी भाजप खासदारांना सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात लोकसभा आणि राज्यसभेत काय कामकाज झालं याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि व्ही मुरलीधरन यांनी दिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पक्षाच्या खासदारांनी विरोधकांचा खरा चेहरा समोर आणा. विरोधक संसदेत येत नाहीत आणि संसदेचं कामकाज होऊ देत नाहीत.

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत मोदी म्हणाले की, पक्षाचे कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 75 गावात जावं. गावात 75 तास थांबावं. यात कार्यकर्त्यांनी डिजिटल लिटरसीची लोकांना माहिती द्यावी.

PM Modi
132 दिवसानंतर देशात आढळले 30 हजारांपेक्षा कमी रुग्ण

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी म्हणाले की, 15 ऑगस्ट 2022 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत 2 कार्यकर्त्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 75 गावांचा दौरा करण्यासाठी निवडण्यात येईल. ते प्रत्येक गावात 75 तास राहतील. स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने सरकार कार्यक्रमाचे आय़ोजन करत आहे. संसदेनं लोकांना देशाचं काम सांगांव असंही मोदींनी भाजप खासदारांना सांगितलं आहे.

राज्यसभा आणि लोकसभेत विरोधकांनी घातलेल्या गोंधळाबाबत राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नाय़डू यांनीही सभागृहात नाराजी व्यक्त केली होती. गदारोळामुळे कामकाज स्थगित झालेल्या राज्यसभेत जर ते सुरळीत झालं असतं तर माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी व मराठा आरक्षणासह अनेक मुद्यांबाबत चर्चा होऊ शकली असती. गोंधळामुळे आठवडाभरात केवळ शून्य प्रहर व विशेषोल्लेखाचे तब्बल ९० मुद्दे पाण्यात गेले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com