पंतप्रधान मोदींना पावसाळी अधिवेशनात अपेक्षा सर्वपक्षीय सहकार्याची

टीम ई सकाळ
सोमवार, 17 जुलै 2017

अधिवदरम्यानच 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांतीची, 'चले जाव' चळवळीची 75 वर्ष होत आहेत.

नवी दिल्ली : पावसाळी अधिवेशनात संसद सदस्य राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेतील. प्रत्येक गोष्टीमध्ये मूल्य वर्धन (व्हॅल्यू अॅडीशन) करण्याचा प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व पक्षांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. 

शेतीविषयक मुद्दे, गोरक्षक, चीनशी ताणलेले संबंध, राष्ट्रपती निवडणूक या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे पावसाळी अधिवेशन होत असल्याने त्याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. 
मोदी म्हणाले, "अनेक अंगांनी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकासाठी संसदेतील सर्व पक्षांनी एकजुटता दाखवली." तसेच, जीएसटी म्हणजे गोईंग स्ट्राँग टुगेदर (एकत्रितपणे सक्षम वाटचाल) आहे, असे वर्णन मोदी यांनी केले. 

अधिवदरम्यानच 9 ऑगस्टला ऑगस्ट क्रांतीची, 'चले जाव' चळवळीची 75 वर्ष होत आहेत. या निमित्ताने संसदेचे सर्व माननीय सदस्य अशीच एकजूट दाखवावी, असे मोदी म्हणाले. 

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:
शंभर टक्‍के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी - मुख्यमंत्री
ट्रोल्सची बिल्ली, राजनाथसिंहांवर म्यॉंव...!​
द्रविड, झहीरची मानहानी करू नका! - गुहा​
भावाने मारलेल्या दगडामुळे बहिणीला गमवावे लागले प्राण​
फेडररचे विक्रमी विजेतेपद​
भिवंडी जवळ अपघातात जुने नाशिकमधील 4 मृत्युमुखी; 2 जखमी​
काँग्रेसचा वाह्यातपणा कधीपर्यत सुरू राहणार?: भांडारकर​
‘आयटी’चा गिअर टाकल्याने पीएमपी होणार ‘गतिमान’​

Web Title: monsoon session PM narendra modi expects all party cooperation