
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सुन केरळमध्ये दाखल होणार आहे.
27 मे रोजी मान्सुन केरळमध्ये दाखल होणार, IMD ने दिली माहिती
नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) (Monsoon) दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात दाखल झाले आहे. त्यामुळे मान्सुनसाठी पोषक वातावरण (Conducive Climate) निर्माण होत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला होता. सध्या बंगालच्या उपसागरात आलेले ‘असनी’ हे चक्रीवादळ निवळत असून, नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे.
दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने आणखी एक ट्विट केलं आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सुन केरळमध्ये दाखल होणार आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या तारखेचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाची सुरुवात दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता असून केरळमध्ये मान्सून 27 मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा शड्डू; राजकीय हालचालींना वेग
सध्या असनी चक्रीवादळ निवळत असले तरी आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी परिसरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. आंध्र प्रदेश व परिसरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. तसेच दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. गेल्या महिन्यात १४ एप्रिल रोजी हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या मॉन्सून हंगामात देशभरात सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे.
गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी वारे २१ मे दरम्यान अंदमानात तर, ३ जून दरम्यान केरळमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर मॉन्सून ५ जूनला महाराष्ट्रात दाखल झाला होता. सध्या असनी चक्रीवादळामुळे सुमुद्रकिनारी असणाऱ्या प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. पश्चिम किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांत वादळी पाऊस सुरु आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवरही होणार असल्याचे हवामान खात्याने नमूद केले होते.
हेही वाचा: केजरीवालांचा मास्टर स्ट्रोक; विदर्भातील बडा नेता राज्यसभेवर जाणार?
Web Title: Monsoon Update Last Week 27 May 2022 Enter Possibility Kerala Says Imd
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..