Monsoon Update : हवामानात अचानक मोठा उलटफेर! ३० हून अधिक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; वाचा सविस्तर

एकाच वेळी ३ हवामान प्रणाली सक्रिय झाल्याने निसर्गाचा प्रकोप; भात आणि उसाच्या पिकांचे अतोनात नुकसान
Sudden major shift in weather; Heavy rain alert with stormy winds in over 30 districts

Sudden major shift in weather; Heavy rain alert with stormy winds in over 30 districts

Sakal

Updated on: 

परतीच्या मान्सूनच्या काळात देशातील हवामानात अचानक मोठा आणि अनपेक्षित बदल झाला असून, अनेक भागांत वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीने प्रचंड हाहाकार माजवला आहे. ताशी २२ ते २६ किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे झाडे व भिंती कोसळून, तसेच वीज पडून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हवामानातील या बदलाचा मोठा तडाखा उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना बसला असून, हवामान खात्याने ३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com