कलम ३७० रद्द झाल्यापासून जवानांचे मृत्यू कमी, पण नागरिकांचे जास्त

Jammu-Kashmir
Jammu-KashmirTeam eSakal

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) कलम ३७० हटवल्यापासून स्थानिकांचे मृत्यू वाढले असून लष्करातील जवानांचे मृत्यू कमी झाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या आठवड्यात संसदेत दिलेली माहिती आणि पोलिसांकडे असलेल्या माहितीवरून ही बाब समोर आली आहे.

Jammu-Kashmir
चिलीमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता

मागील काही महिन्यांत काश्मीर खोऱ्यात अल्पसंख्याक आणि स्थलांतरित कामगारांसह नागरिकांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा अधिक वाढविण्यात आली आहे. हल्ले झाल्यापासून २० हून अधिक संशयित दहशतवाद्यांना मारल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी केला आहे. गेल्या १ डिसेंबरला संसदेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशवादी घातपात कमी होत असल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी माहिती देखील सादर केली होती.

ऑगस्ट २०१९ पासून जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यात जवळपास ३.२ टक्के मृत्यू एका महिन्यात झाले. पण, पाच वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यांमध्ये २.८ टक्के मृत्यू झाले होते. याच तुलनेत जम्मू आणि काश्मीरमध्ये त्या कालावधीत मारल्या गेलेल्या लष्करी जवानांची आकडेवारी आता दरमहा १.७ आहे, तर पूर्वी ही आकडेवारी दरमहा २.८ टक्के होती. मे 2014 आणि ऑगस्ट 5, 2019 पर्यंत ६३ महिन्यांच्या कालावधीमध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये १७७ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटविण्यात आला. तेव्हापासून 27 महिन्यांत म्हणजे नोव्हेंबरपर्यंत 87 नागरिकांचा बळी गेला. त्यापैकी 40 हून अधिक जणांचा या वर्षी मृत्यू झाला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये २०१९ मध्ये २५५, २०२० मध्ये २४४ दहशतवादी हल्ले झाले होते. यंदा नोव्हेंबरपर्यंत २०० पेक्षा अधिक हल्ले झाल्याची नोंद आहे.

गुप्तचर संघटना आणि जम्मू-काश्मीर पोलिस या दोघांनीही माहितीची योग्य देवाणघेवाण केल्यामुळे अनेक चकमकी यशस्वी झाल्या. स्थानिकांचे मृत्यू आणि दहशतवादी हल्ले परतवून लावण्यात आम्ही सक्षम आहोत, असं गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com