चिलीमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता

same sex marriage
same sex marriagegoogle

चिलीमध्ये मंगळवारी समलैंगिक विवाहाला (Same Sex Marriage) कायदेशीर मान्यता देण्यात आली. दोन्ही सभागृहात बहुमत मिळवून हा कायदा पारीत करण्यात आला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून समलैंगिक विवाहासाठी कायद्याची प्रतिक्षा करणाऱ्या समुदायाला खूप मोठा दिलासा मिळाला असून चिली हे समलैंगिक कायद्याला (Same Sex Marriage Act) मान्यता देणारे ३१ वे राष्ट्र बनले आहे.

same sex marriage
एका मिनिटात मृत्यू, स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरण यंत्राला कायदेशीर मान्यता

चिलीकडे पुराणमतवादी देश म्हणून पाहिले जात होते. त्यामुळे या देशात हा कायदा होईल असे कोणालाही वाटले नव्हते. मात्र, चिलीतील काही नागरिकांनी ही मागणी लावून धरली होती. २०१९ मध्ये लाखो चिली लोक रस्त्यावर उतरले होते. आज त्याचाच परिणाम म्हणून चिलीमध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. हा या आंदोलनकर्त्या लोकांचा विजय असून चिलीमध्ये गेल्या दशकभरात सामाजिक चित्र किती बदललं? याचं देखील हे एक उदाहरण आहे. याबाबत न्यूयॉर्क टाइम्सने वृत्त दिले आहे.

चिलीच्या सामाजिक जीवनात प्रगती होत होती. मात्र, येथील राजकीय नेते आंधळे आणि मुके झाले होते. त्यामुळे या मुद्द्यांकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केले गेले. समलैंगिकांच्या अधिकारांसह अनेक मुद्द्यांना राजकीय वर्ग आतापर्यंत टाळत होता. मात्र, आता त्यांना समलैंगिक विवाहासाठी मान्यता द्यावी लागली, असे चिलीमधील समलैंगिक हक्क संघटनेच्या नेत्यांपैकी एकाने न्यूयॉर्क टाईम्सला सांगितले.

राष्ट्राध्यक्ष सेबॅस्टियन पिनेरा हे आधीपासूनच समलैंगिक विवाहाच्या विरोधात होते. मात्र, जून महिन्यात अचानक त्यांनी समलैंगिक विवाहाबद्दल सकारात्मक भूमिका दर्शवली. त्यामुळे राजकीय वर्गाला प्रचंड धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी अनेक दिवसांपासून रखडलेले समलैंगिक विवाहासंबंधीचे विधेकय पारीत करण्यास सरकारला विनंती केली. त्यानंतर हा कायदा पारीत करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com