'जिओ'ची आता आणखी आकर्षक ऑफर

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

नवी दिल्ली - भरघोस सवलती देत दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र करणाऱ्या रिलायन्स जियोने ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक योजना सादर केली आहे. या योजने अंतर्गत जियोच्या 'प्राइम' सदस्यांना 303 रुपये मासिक शुल्क भरल्यास या आधी घोषित करण्यात आलेल्या 28 जीबी डेटाशिवाय 5 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे.

"जियो प्राईम सदस्यत्व' योजने अंतर्गत एकदा 99 रुपये सदस्य नोंदणी शुल्क भरून ग्राहकांना मोफत व्हॉईस कॉल्स (एसटीडी आणि रोमिंग), एसएमएस आणि 28 जीबी 4G डेटा उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना दिवसाला एक जीबीपर्यंत डेटा वापरण्याची मुभा होती. डेटा वापरण्याची मर्यादा संपल्यानंतर यापूर्वीच्या योजनेत कमी वेगाने डेटा उपलब्ध होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता एक जीबी डेटाची मर्यादा संपल्यानंतरदेखील ग्राहकांना त्याच वेगाने आणखी पाच जीबी डेटा उपलब्ध होऊ शकणार आहे. या योजनेसाठी 31 मार्चपूर्वी नोंदणी बंधनकारक आहे. जियो आणि त्यांच्या पार्टनरकडून दिल्या जाणाऱ्या इतर अनेक आकर्षक योजना असणार आहेत, ज्याचा लाभ "जियो प्राईम सदसयांना' मिळेल.

त्याचप्रमाणे, महिन्याला 499 रुपयांचे रिचार्ज करणाऱ्यांना अतिरिक्त 10 जीबी डेटा उपलब्ध होणार आहे. हा अतिरिक्त डेटा केवळ पहिल्या महिन्यात उपलब्ध असणार आहे.

Web Title: More attractive offer of JIO