esakal | धुम्रपान किंवा कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू प्रदुषणामुळे; देशभरात 17 लाख लोकांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

धुम्रपान किंवा कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू प्रदुषणामुळे; देशभरात 17 लाख लोकांचा मृत्यू

या मृत्यूंपैकी 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यू 1 लाख 50 हजाराहून अधिक झाला आहे, या वयोगटातील मृत्यू आणि आजारासाठी वायू प्रदूषण हा सर्वात महत्वाचा धोका घटक आहे.

धुम्रपान किंवा कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू प्रदुषणामुळे; देशभरात 17 लाख लोकांचा मृत्यू

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनापेक्षा अधिक मृत्यू प्रदुषणामुळे होत असून 2019 साली देशभरात प्रदूषणामुळे तब्बल 17 लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सादर केलेल्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल लॅन्सेट हेल्थ जर्नलमध्ये ही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स एँड इव्हॅल्युएशन या संस्थेने वायू प्रदूषणास कारणीभूत असलेल्या रोगाच्या अंदाजाबद्दल एक अहवाल जाहीर केला. त्यातून भारतातील प्रदुषणाची सद्यस्थिती समोर आली. या अंदाजानुसार वायू प्रदूषणामुळे दरवर्षी 1.7 दशलक्ष अकाली मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृत्यूंपैकी 5 वर्षाखालील मुलांचा मृत्यू 1 लाख 50 हजाराहून अधिक झाला आहे, या वयोगटातील मृत्यू आणि आजारासाठी वायू प्रदूषण हा सर्वात महत्वाचा धोका घटक आहे.

महत्त्वाची बातमी : संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतील 35 महत्त्वाचे मुद्दे; भाजपाला म्हणतात "जो उखाडना है उखाडो"

देशातील इनडोअर आणि आऊटडोअर प्रकाराच्या प्रदूषणात गेल्या काही  वर्षात सातत्याने वाढ होत आहे. त्यात ओझोन प्रदूषणाचाही समावेश आहे. देशभरातील 17 लाख नागरिकांच्या मृत्यूचे टक्केवारीतील प्रमाण हे 17.8 टक्के आहे. खुल्या जागेवरील प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. या प्रदूषणामुळे 9 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बंदिस्त जागेतील प्रदूषणामुळे 6 लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, 1990 पासून 2019 सालाचा विचार करता, बंदिस्त जागेतील प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे 64.2 टक्क्यांनी घटले आहे, तर बाहेरील प्रदूषणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण हे 115.3 टक्क्यांनी वाढले आहे.

ओझोन प्रदूषणाचा विचार करता, हे प्रमाण 139.2 टक्क्यांनी वाढले आहे. याचा अर्थ बंदिस्त जागेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी असून, रस्ते, सार्वजनिक जागा येथील तत्सम ठिकाणांवरील प्रदूषणाचे प्रमाण अधिक असून, धूम्रपानापेक्षा कितीतरी पटींनी अधिक मृत्यू हे प्रदूषणामुळे होत आहेत. दरम्यान, प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाच, आर्थिक तोट्यातही भर पडत असल्याने मनुष्यहानीसह आर्थिक असे दुहेरी नुकसान होते आहे.

महत्त्वाची बातमी : वर्षा राऊत यांना ED नोटीस; आदित्य ठाकरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

फुफ्फुसासंबंधी आजारांमध्ये वाढ

प्रदुषण वाढल्याने फुफ्फुसासंबंधी आजारांमध्ये वाढ झाली असून त्याचे प्रमाण 36.6 इतके झाले आहे. त्यामुळे सीओपीडी 21.1, लोअर रेस्पिरेटरी इंफेक्शन 14.2, फुफ्फूसाचा कर्करोग 1.2 आणि इतर आजारांमध्ये ह्रदयविकार 24.9, स्ट्रोक 14.1, मधूमेह 8.4, लिओनेटल डिसऑर्डर 13.3, डी कॅटरॅक्ट 2.7 टक्के इतके झाले आहे.

वरवरची मलमपट्टी नको

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याकडे ग्रामीण आणि शहरी भारतातील महत्वाकांक्षी आणि समन्वित कृती असणे आवश्यक आहे. यावर वरवरची मलमपट्टी नको आहे, कारण देशातील कोविड19  साथीच्या रोगापेक्षा जास्त लोक यावर्षी वायू प्रदूषणामुळे अकाली मृत्यूमुखी पडण्याची भिती आहे. वायू प्रदूषणाला महामारी समजून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भगवान केसभट यांनी सांगितले.

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

धुम्रपानापेक्षा अधिक मृत्यू हे प्रदुषणामुळे

प्रदुषण ही मोठी समस्या बनली आहे. धुम्रपानापेक्षा अधिक मृत्यू हे प्रदुषणामुळे होत आहेत. सरकार याप्रकरणी फार गंभीर असल्याचे दिसत नाही. प्रदुषणाबाबतची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचा प्रकार थांबवायला हवा. सर्व सरकारी यंत्रणांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे असल्याचे पर्यावरण अभ्यासक फराह ठाकूर यांनी सांगितले. 

More deaths than smoking or corona are due to pollution1 point 7 million people lost life in one year

loading image