esakal | वर्षा राऊत यांना ED नोटीस; आदित्य ठाकरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षा राऊत यांना ED नोटीस; आदित्य ठाकरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना मिळालेल्या नोटिशीवर विविध राजकीय प्रतिक्रिया देखील येतायत.

वर्षा राऊत यांना ED नोटीस; आदित्य ठाकरे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावला आहे. PMC बँकेतील व्यवहारांप्रकरणी ED ने वर्षा राऊत यांना समन्स बजावला आहे. उद्या ED कार्यालयात चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ED ने बोलावलं आहे. PMC बँकेतील एका आरोपीच्या पत्नीच्या मदतीने वर्षा राऊत यांनी ५५ लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा मिसेस राऊत यांच्यावर आरोप आहे. दरम्यान संजय राऊत यांनी राज्यसभेच्या शपथ पत्रात ५५ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचं नमूद केलंय. हे पैसे कशासाठी घेतलेत याबाबत ED ला माहिती हवी आहे. 

संजय राऊत यांच्या मिसेस वर्षा यांच्या ED चौकशी प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि उद्धव  ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ED चौकशी म्हणजे राजकारण असून महाविकास आघाडी भक्कम असल्याचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी : "आता मी माझा माणूस भाजपच्या ऑफिसमध्ये पाठवला आहे, दुपारी दोन वाजता बोलेन" : संजय राऊत

काय म्हणालेत आदित्य ठाकरे ? 

"मला वाटतं की, आपल्यालाही माहितीये की हे राजकीय आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडी या कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. आम्ही एकत्र आहोत आणि या देशासाठी तसेच महाराष्ट्रासाठी काम करत आहोत." 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा 

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना मिळालेल्या नोटिशीवर विविध राजकीय प्रतिक्रिया देखील येतायत. सध्या बऱ्याच लोकांना ED ची नोटीस येत आहे. मात्र, आता ED नोटिशीला अर्थ राहिला नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणालेत. तर, "जो भाजप विरोधात बोलेल त्यांच्या मागे ED आणि CBI लावली जाते. ED चा अशा प्रकारे वापर अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यात असं राजकारण कधीही पाहायला मिळालं नाही", असं गृहमंत्री अनिल देखमुख म्हणालेत. 

reaction of shivsena leader aaditya thackeray on ED notice to varsha raut wife of sanjay raut
  

loading image