चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मेंदूच्या गंभीर आजाराने ग्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

President_Xi_Jinping_20edited.jpg

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग मेंदूच्या गंभीर आजाराने ग्रस्त

बीजिंग : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांना 'सेरेब्रल एन्युरिझम' (Cerebral Aneurysm) या मेंदूसंबंधी गंभीर आजाराने ग्रासले आहे, अशी माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर, जिवपिंग यांना 2021 च्या अखेरीस रुग्णालयातदेखील दाखल करावे लागले होते. मीडिया रिपोर्ट्सच्या हवाल्याने हे वृत्त समोर आले आहे. (china President Xi Jinping Suffering From Cerebral Aneurysm )

हेही वाचा: 'मैत्रिचा हात पुढे करून राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसलाय', पटोलेंचं 'टार्गेट पवार'

सेरेब्रल एन्युरिझम किंवा ब्रेन एन्युरिझम हा मेंदूसंबंधीचा एक आजार आहे, ज्यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्या किंवा धमन्या फुगायला लागतात आणि त्यात रक्त भरले जाते. या वाहिन्या फुग्यांसारख्या बनतात आणि त्या फुटण्याचा धोका निर्माण होतो. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये ज्या ठिकाणी स्पॉट तयार होतो त्या ठिकाणीच्या धमन्या कमकुवत होतात आणि त्या फुटण्याची भीती निर्माण होते.

हेही वाचा: राजद्रोहाचे खटले दाखल करू नका, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेषत: कोविड-19 महामारीचा उद्रेक झाल्यानंतर बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकपर्यंत त्यांनी कोणत्याही परदेशी नेत्याला भेटण्याचे टाळले होते. तसेच मार्च 2019 च्या सुरुवातीस शींच्या इटली दौऱ्यात त्यांच्या चालण्यामध्येदेखील फरक असल्याचे जाणवले होते. तर फ्रान्स दौऱ्यामध्ये जिनपिंग बसून आधार घेत असल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर, ऑक्टोबर 2020 मध्ये शेन्झेनमधील जाहीर सभेत जिनपिंग उपस्थित राहिल्यानंतर त्यांच्या तब्येतीची पुन्हा चर्चा सुरू झाली. मात्र, या सभेमध्ये जिनपिंग अतिशय संथ आवाजात भाषण करत होते, तसेच त्यांना सतत खोकला येत होता.

Web Title: Chinese President Xi Jinping Suffering From Cerebral Aneurysm Says Report

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top