How Many Waqf properties Ilegally Encroached : वक्फ बोर्डाच्या ९९४ संपत्तीवर अवैधरित्या अतिक्रमण करण्यात आलं असून यात एकट्या तामिळनाडूतील ७३४ मालमत्तांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेत दिली आहे.
कम्युनिस्ट पार्टीचे नेते जॉन ब्रिटास यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. याबरोबरच देशात वक्फ अधिनियम अंतर्गत ८ लाख ७२ हजार ३५२ स्थावर आणि १६ हजार ७१३ जंगम वक्फ मालमत्ता नोंदणीकृत आहे, असेही त्यांनी सांगितलं.