e-Shram पोर्टलवर 1 कोटींहून अधिक कामगारांची नोंदणी

e-Shram
e-ShramGoogle
Updated on

नाशिक : केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवर गेल्या २४ दिवसांमध्ये एक कोटींहून अधिक असंघटीत कामगारांनी नोंदणी केली आहे. त्यात महाराष्ट्रातील तीन लाख कामगारांचा समावेश आहे. बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी या नोंदणीत आघाडी घेतली आहे. २०१९-२० च्या आर्थिक पाहणीनुसार देशात ३८ कोटी असंघटित कामगार असून त्यांची नोंदणी करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.


पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांची संख्या १ कोटी ३ लाख १२ हजार ९५ इतकी आहे. त्यापैकी ४३ टक्के महिला, तर ५७ टक्के पुरुष कामगार आहेत. बांधकाम क्षेत्र, तयार कपड्यांचे उत्पादन, मासेमारी, रोजंदारी करणारे मजूर आणि फलाटावर काम करणारे मजूर, रस्त्यावरील व्यवसाय (फेरीवाले), घरगुती काम, शेती आणि त्या संबंधित क्षेत्र, वाहतूक क्षेत्र आदी विविध क्षेत्रांतील असंघटित कामगारांचा सर्वसमावेशक ‘डेटाबेस' तयार करण्याच्या दृष्टीने प्रथमच पाऊल उचलण्यात आले आहे. ई-श्रम पोर्टलची सुरवात केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी २६ ऑगस्ट २०२१ ला केली. स्थलांतरित कामगार आता ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करून विविध सामाजिक सुरक्षा आणि रोजगार-आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात.

e-Shram
गर्भवती महिलांच्या लसीकरणाबाबत सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस


ऑनलाइन नोंदणीसाठी, कामगार वैयक्तिकपणे ई-श्रमच्या मोबाइल ॲप'चा प्रयोग करु शकतात. अथवा वेबसाइट वापरू शकतात. या पोर्टलमध्ये स्वतःची नोंदणी करण्यासाठी ते सर्वसाधारण सेवा केंद्र, राज्य सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र, पोस्टाच्या निवडक टपाल कार्यालयांना भेट देऊन या पोर्टलवर आपली नोंदणी करु शकतात. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर, असंघटित कामगारांना डिजीटल ई-श्रम कार्ड मिळेल आणि ते पोर्टल अथवा मोबाईल ॲपद्वारे त्यांची माहिती, तपशील अद्ययावत करू शकतील. तसेच त्यांना सर्वसमावेशक खाते क्रमांक (डिजिटल ई-श्रम कार्डवर- eSHRAM युनिव्हर्सल अकाउंट नंबर) मिळेल. तो देशभरात स्वीकारला जाईल आणि त्यांना आता विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्याची आवश्यकता राहणार नाही.

मोफत नोंदणी आणि अर्थसहाय्य

ई-श्रम पोर्टलवर नोंदणी मोफत आहे. तसेच एखाद्या कामगाराने ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली असेल आणि त्याचा अपघाती मृत्यू झाला अथवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये अर्थसहाय्य मिळेल. याशिवाय अंशतः अपंगत्व आल्यास एक लाख रुपये अर्थसहाय्य मिळण्यास कामगार पात्र असेल.

e-Shram
पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला ते मुश्रीफांचा दुसरा घोटाळा १०० कोटींचा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com