Mos Anurag Thakur troll on Social media on worshiping god
Mos Anurag Thakur troll on Social media on worshiping god

'हे बजरंगबली, कुछ नए नारे बताओ'; 'त्या' फोटोमुळे अनुराग ठाकूर फुल्ल ट्रोल

Published on

नवी दिल्ली : 'मोदी सरकार 2'चा दुसरा अर्थसंकल्प आज (ता. 1) पार पडला. केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. त्यांच्यासह केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली. केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यापासून ते आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीपर्यंत ते सितारामन यांच्यासोबत होते. मात्र आज सकाळी त्यांचा एक फोटो एएनआयवर शेअर करण्यात ज्यामुळे ते प्रचंड ट्रोल झाले आहेत... काय आहे तो फोटो?

कोणतेही चांगले काम करण्यापूर्वी देवाचा व थोरामोठ्य़ांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे. मंत्री अनुराग ठाकूर यांनीही बजेट सादरीकरणापूर्वी घरात देवाचा आशीर्वाद घेतला. तसेच बंगल्याबाहेर येऊन त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. हनुमानाचे दर्शन घेतानाचा हाच फोटो एएनआयवर पोस्ट करण्यात आला. काहींनी या फोटोचे दर्शन घेतले, तर काहींनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. 

घरात काही देव नाहीत का, म्हणून बाहेर येऊन दर्शन घेताय, ज्यादा बजट मांगने वालों को, गोली मारो सालो को, फोटोसाठी नौटंकी करत आहेत, हा पब्लिसीटी स्टंट आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स या फोटोवर येत आहेत. 

काही दिवसांपूर्वीच दिल्ली निवडणूकीसाठीच्या एका प्रचारसभेत ठाकूर यांनी 'देश के गद्दारों को, गोली मारो सालोंको' अशा प्रकारच्या आक्षेपार्ह घोषण उपस्थितांकडून म्हणून घेतल्या होत्या. यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर आज शेअर झालेल्या या फोटोमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करणयात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com