esakal | Budget 2020 : अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न; प्राप्तीकरातून दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala-Sitharaman

शिक्षण, रोजगार आणि आरोग्य यावर सरकार भर देणार आहे. पर्यटन, संस्कृती, पर्यावरण, महिला, एससी-एसटी यासाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे.

Budget 2020 : अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचा प्रयत्न; प्राप्तीकरातून दिलासा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

अर्थसंकल्प 2020 : नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला उभारी देण्याच्या दृष्टीने सरकराने पाऊल टाकले असून, काही धडाकेबाज निर्णय घेत आज (शनिवार) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षात देशाचा आर्थिक विकासदर (जीडीपी) 10 टक्के राहील असा अंदाज वर्तवत, प्राप्तिकर रचनेत सर्वसामान्यांना दिलासा मिळेल असा निर्णय घेण्यात आला आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तर, एलआयसीतील भागीदारी विकणे, बँकांचे विलीनीकरण आणि बँकांमधील गॅरंटीची मर्यादा वाढविणे असे काही महत्त्वपूर्ण निर्णय सरकारकडून घेण्यात आले आहेत. 

- Budget 2020 : दुनिया का सबसे प्यारा वतन; अर्थमंत्र्यांनी सादर केली काश्मिरी कविता!

निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. लाल रंगाच्या चोपड्यातून अर्थसंकल्पाची कागदपत्रे आणण्याची परंपरा यावर्षीही कायम होती. जीएसटी करप्रणालीमुळे फायदा झाल्याचे सांगत सीतारामन यांनी याचे श्रेय माजी अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांना दिले. तसेच त्यांनी जीएसटीसाठी 1 एप्रिलपासून नवी प्रणाली आणणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

जीएसटीमुळे अनेक कर कमी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कृषी क्षेत्रासाठी सरकराने भरीव तरतूद केल्याचे पाहायला मिळाले असून, मुद्रा योजना कृषी क्षेत्रातही लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. झिरो बजेट शेतीला सरकार प्राधान्य देणार आहे. मत्स्य आणि दूध उत्पादनासाठी सरकारकडून अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत.

- Budget 2020 : बँकांमधील ठेवी आता आणखी सुरक्षित; मर्यादा 5 लाखांपर्यंत!

सरकारने पीपीपी मॉडेलअंतर्गत 5 नवी स्मार्ट शहरे उभारण्याचा निर्णय घेतला असून, स्टार्टअपसाठी डिजीटल प्लॅटफॉर्म सुरु करण्यात येणार आहे. सरकारने अनेक नव्या योजना व निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने निर्यातदारांसाठी नार्विक योजना, आरोग्यासाठी मिशन इंद्रधनुष्य, टीबी हारेगा, देश जितेगा, ऑनलाईन पदवी मिळविता येणार, पंतप्रधान कुसुम योजना आदींचा यामध्ये समावेश आहे. 

- Budget 2020 : देशात 2025 पर्यंत 100 नवी विमानतळं!

भारत ही देशातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असून, अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. शिक्षण, रोजगार आणि आरोग्य यावर सरकार भर देणार आहे. पर्यटन, संस्कृती, पर्यावरण, महिला, एससी-एसटी यासाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे. बँकांबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

- Budget 2020 : 'एलआयसी'बाबत सरकारचा मोठा निर्णय

एलआयसीमधील सरकारी हिस्सा विकण्याचा निर्णय घेत, 10 बँकांचे विलिनीकरण करून 4 बँका करण्यात येतील हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. हवाई क्षेत्रातील प्रगती पाहता नवी 100 विमानतळे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

loading image