esakal | अयोध्येतील मशिदीस क्रांतिकारकाचे नाव?
sakal

बोलून बातमी शोधा

Masjid

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येबाबत दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली असताना मशिदीसाठीच्या हालचालींनाही वेग आला आहे. येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या मशिदीला थोर क्रांतिकारक मौ. अहमदुल्लाह शाह यांचे नाव देण्याचा विचार सुरू आहे.

अयोध्येतील मशिदीस क्रांतिकारकाचे नाव?

sakal_logo
By
पीटीआय

अयोध्या - सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येबाबत दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली असताना मशिदीसाठीच्या हालचालींनाही वेग आला आहे. येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या मशिदीला थोर क्रांतिकारक मौ. अहमदुल्लाह शाह यांचे नाव देण्याचा विचार सुरू आहे. ब्रिटिशांविरोधात १८५७ साली झालेल्या उठावामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.

सुन्नी वक्फ बोर्डाने स्थापन केलेल्या इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन हा ट्रस्टच्या देखरेखीखाली या मशिदीच्या उभारणीचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अवध प्रांतामध्ये १८५७ साली झालेल्या उठावाचे मौ. अहमदुल्लाह शाह हे दीपस्तंभ मानले जातात. अयोध्येमधील वास्तूला त्यांचे नाव देण्याबाबत आमचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे या ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी सांगितले.

बंधूभाव अन्‌ देशभक्तीचे प्रतीक
मशिदीसाठी ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर नव्याने उभारल्या जाणाऱ्या वास्तूला बाबराचे नाव द्यायचे की नाही याबाबत देखील बराच खल झाला, अन्य नावांच्या प्रस्तावांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. अयोध्येतील वास्तू ही धार्मिक बंधूभाव आणि देशभक्तीचे प्रतिक ठरावे म्हणून हा प्रकल्प शाह यांना समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  मौ. अहमदुल्लाह शाह हे भारतीय मूल्ये आणि इस्लामचे खरेखुरे अनुयायी होते, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले. याबाबत ट्रस्टकडे विविध नावांचे प्रस्ताव आले होते, त्या प्रस्तावांमध्ये शाह यांच्या नावांचा उल्लेख होता, याबाबत आणखी चर्चा केल्यानंतर आम्ही या नावाची घोषणा करू, असे ट्रस्टने सांगितले.

लाल किल्ल्यावर जे झालं त्याबद्दल माफ करा; शेतकऱ्यांचा मोठा निर्णय

इंग्रजांशी झुंजणारा योद्धा
५ जून १८५८ रोजी इंग्रजांशी संघर्ष करताना शाह हुतात्मा झाले होते. ब्रिटिश अधिकारी जॉर्ज माल्लेसन आणि थॉमस सीटन यांनीही शाह यांच्या शौर्याचे, संघटन कौशल्याचे तोंडभरून कौतुक केले होते. माल्लेसन यांनी लिहिलेल्या भारतीय उठावाचा इतिहास या ग्रंथामध्ये शाह यांच्या नावाचा उल्लेख दिसून येतो. अवध प्रांतामध्ये ब्रिटिशांविरोधात बंडाचा झेंडा रोवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. फैजाबादेतील  मशीद सराई ही वास्तू शाह यांचे मुख्यालय होती. येथेच त्यांच्या स्थानिक क्रांतीकारकांसोबत देखील बैठका होत असत.

मुस्लिम धर्माचे पालन करणारे अहमदुल्लाह शाह हे गंगा- यमुना सांस्कृतिक ऐक्याचे आदर्श उदाहरण होते.  १८५७ च्या उठावामध्ये कानपूरमधील नानासाहेब आणि अराचे कुंवरसिंह हे देखील शाह यांच्या बाजूने लढले होते.
- रामशंकर त्रिपाठी, स्थानिक इतिहास संशोधक

Edited By - Prashant Patil

loading image