esakal | लाल किल्ल्यावर जे झालं त्याबद्दल माफ करा; शेतकऱ्यांचा मोठा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

farmers protest delhi tractor parade

प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हिंसाचारानंतर बुधवारी शेतकरी नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

लाल किल्ल्यावर जे झालं त्याबद्दल माफ करा; शेतकऱ्यांचा मोठा निर्णय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हिंसाचारानंतर बुधवारी शेतकरी नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या व्यासपीठावरून शेतकरी नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी सांगितलं की, शेतकरी प्रजासत्ताक परेडमध्ये 2 लाखांहून जास्त ट्रॅक्टर सहभागी झाले होते. जगाची नजर याकडे लागून राहिली होती. सरकारने कट रचून हे आंदोलन मोडून टाकण्याचा प्रयत्न केला. सरकारने पंजाबच्या शेतकरी कामगार समितीला परेडमध्ये पुढे आणून बसवलं. सरकारने त्यांच्यासोबत हातमिळवणी केली होती असाही आरोप त्यांनी केला.

आमच्या प्रत्येक मार्गावर अडथळा तयार करण्यात आला. स्वत: सरकारने सर्वांना लाल किल्ल्यावर आणि आयटीओवर पाठवलं हे सर्वांना माहिती आहे. दीप सिद्धू सरकारचाच माणूस आहे. 26 जानेवारीला पोलिस चौकीवर सगळे पोलिस सोडून गेले आणि त्यांनी आपलं काम केलं. त्यांनी धार्मिक झेंडा फडकावला. यामुळे आमच्यासह देशाच्या भावना दुखावल्या. याबद्दल आम्ही कोणत्याही अटीशिवाय देसाची माफी मागतो. मात्पर शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरुच राहील असं बलबीर यांनी सांगितलं. 

हे वाचा - शेतकरी आंदोलनाला गालबोट लावणारा दीप सिद्धू आहे तरी कोण?

दरम्यान, अर्थसंकल्प सादरीकरणाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला संसदेवर काढण्यात येणारी पदयात्रा स्थगित करण्यात आल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली. त्याआधी 30 जानेवारीला देशभरात आंदोलकांकडून मोठ्या सभा घेतल्या जातील आणि एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. संसदेवर काढण्यात य़ेणारा मोर्चा स्थगित केला असून तो कधी काढणार याबाबत नंतर जाहीर करण्यात येईल अशीही माहिती दिली. 

हे वाचा - शेतकरी आंदोलनात फूट; टिकैत यांनी विश्वासघात केला म्हणत एका गटाची माघार

योगेंद्र यादव यांनी प्रजासत्ताक दिनी झालेली ट्रॅक्टर रॅली यशस्वी झाल्याचं सांगितलं. काही घटना शेतकरी आंदोलनात ठरल्यानुसार झाल्या नाहीत. तुम्हाला माहिती आहे की आम्ही या हिंसाचारापासून दूर होतो आणि ठेवलं. दीप सिद्धू आणि पंजाब शेतकरी कामगार समितीच्या भूमिकेचा पर्दाफाश केला. दीप सिद्धूच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो. तिरंग्याचा अपमान हा देशाचा अपमान आहे. त्याल शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी केली.