
कोलकात्यात आई आणि मुलगी एका सुटकेसमधून महिलेचा मृतदेह घेऊन गंगेत सोडण्यासाठी आल्या होत्या. गंगेत मृतदेह सोडण्याआधी शंका आल्यानंतर लोकांनी त्यांची चौकशी केली. जेव्हा त्यांच्याकडे असलेली सुटकेस उघडण्यात आली तेव्हा त्यात महिलेचा मृतदेह पाहून सर्वांनाच धक्का बसला. भरदिवसा एक मृतदेह गंगा नदीच्या किनाऱ्यावर मायलेकी घेऊन आल्या होत्या.