'ते' कृत्य पाहिल्याने मातेने केला मुलाचा खून

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

कोलकता (पश्चिम बंगाल): चौदा वर्षाच्या प्रियकर मुलासोबत नको त्या अवस्थेत व 'ते' कृत्य पाहिल्याने 28 वर्षाच्या महिलेने आपल्या सात वर्षाचा मुलाचा खून केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

राजापूर गावामधील सागरी (वय 28) या महिलेचे 14 वर्षाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. सागरी ही शेतकरी असलेला पती व सात वर्षाच्या मुलासोबत रहात होती. दोन दिवसांपासून सात वर्षांचा मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार पित्याने पोलिसांकडे दाखल केली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्यानंतर सागरी हिने प्रेमसंबंधातून मुलाचा खून झाल्याचे उघड झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरी हिचे गावातील 14 वर्षाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. सागरीचा पती शेतात काम करण्यासाठी गेल्यानंतर ती अल्पवयीन असलेल्या मुलाला घरी बोलवत असे. तिचा सात वर्षाचा मुलगा त्याच्यासोबत खेळत असे. अनेकदा मुलाला खेळायला बाहेर पाठवून ते नको ते कृत्य करत असत. गुरुवारी (ता. 24) मुलाला खेळण्यासाठी घराबाहेर पाठविले होते. परंतु, घराबाहेर खेळायला कोणी नसल्यामुळे तो परत घरी आला. यावेळी सागरी व अल्पवयीन मुलगा नको त्या अवस्थेत होते. आपल्या मुलाने सर्व काही पाहिल्याचे सागरी हिच्या लक्षात आले. यानंतर तिने आपल्या सात वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून केला व मृतदेह एका खड्ड्यात पुरला. पती घरी आल्यानंतर मुलाचा शोध घेतला असता तो न आढळल्याने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.

Web Title: Mother kills 7 year old son who catches her with 14 year old lover