

Police at the Navsari apartment where Sunita Sharma was arrested after allegedly strangling her two children and attempting to attack her father-in-law.
esakal
Summary
नवसारीच्या बिलीमोरा येथे एका महिलेने पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आपल्या दोन मुलांची गळा दाबून हत्या केली.
आरोपी सुनीता शर्मा ही मूळ उत्तर प्रदेशातील असून पती, दोन मुले आणि सासऱ्यासोबत राहत होती.
पती शिवकांत टायफॉइडमुळे रुग्णालयात दाखल असल्याने घरात फक्त सुनीता आणि सासरे होते.
गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून एका महिलेने आपल्या पोटच्या दोन मुलांचा गळा दाबून खून केला आहे. महिलेने तिच्या सासऱ्यालाही मारण्याचा प्रयत्न केला पण तिच्या तावडीतून सुटका करुन पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्याचा जीव वाचला.