Mother Teresa Birth Anniversary : आयुष्यभर लोकांसाठी झटणाऱ्या मदर तेरेसांचं खरं नाव काय होतं?

निस्वार्थ सेवेसाठी जगभऱ्यात ओळखल्या जाणाऱ्या मदर तेरेसा यांचं खरं नाव काय होतं ते जाणून घेऊया.
Mother Teresa Birth Anniversary
Mother Teresa Birth Anniversary esakal

Mother Teresa Birth Anniversary Special : जगभऱ्यात निस्वार्थ समाजराकार्य करणाऱ्या मदत तेरेसा यांची आज ११०वी जयंती. शांतीचं मूर्तीरूप प्रतिक मानल्या जाणाऱ्या मदर तेरेसा यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी, त्यांच्या भल्यासाठी समर्पित केलं. दु:खितांना आलिंगण घालत, रूग्णाच्या चेहऱ्यावर हसू आणत त्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या हसण्यात स्वत:चं हसू सामावून घेतलं. त्यांच्या जयंती निमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी. (Mother Teresa Birth Anniversary)

मदर तेरेसा या कॅथोलिक होत्या मात्र त्यांना भारतीय नागरिकत्व मिळालं होतं. भारतासह त्यांना अनेक देशांच नागरिकत्व मिळालं होतं. १९४६ मध्ये त्यांनी गरीब, असहाय लेकांची सेवा करण्याचं प्रण घेतलं. निस्वार्थ सेवाभावाने त्यांनी १९५० मध्ये कोलकातामध्ये 'मिशनरीज ऑफ चॅरिटी' ची स्थपना केली होती. आणि १९८१ मध्ये त्यांनी त्यांचं नाव बदललं. मूळच्या अल्बानियाच्या मदर तेरेसांना कोलकाताच्या गरीब आणि पिडित लोकांच्या सेवेसाठी जगभरात ओळखल्या जातं. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. पिडितांच्या सेवेसाठी त्यांना नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Mother Teresa Birth Anniversary
Mother’s Day: का साजरा केला जातो 'मदर्स डे'? जाणून घ्या रंजक इतिहास

फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही त्यांच्या कार्यासाठी त्या ओळखल्या जातात. मदर तेरेसा त्यांच्या अखेरच्या क्षणी कोलकातामध्येच होत्या. अनेकांना माहिती नाही पण मदर तेरेसाच्या शेवटच्या क्षणी लोकांनी त्यांच्यावर अनेक आरोप केलेत. त्यांच्यावर धर्म बदलण्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकृतीत बिघाड आल्याने ५ सप्टेंबर १९९७ साली त्यांचा मृत्यू झाला.

Mother Teresa Birth Anniversary
Mahatma Gandhi : "इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर नाही तर .. "

मदर तेरेसा यांनी त्यांच्या १२ सदस्यांसह त्यांची संस्था सुरू केली होती. आज त्यांची ही संस्था १३३ देशांमध्ये कार्यरत आहे. १३३ देशांमध्ये त्यांच्या ४५०१ सिस्टर्स आहेत. मदर तेरेसा यांचं खंरं नाव 'Anjezë Gonxhe Bojaxhiu' असे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com