Mahatma Gandhi : "इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर नाही तर .. "

इस्लाम धर्म कसा प्रस्तृत झाला याचे उत्तर राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिले आहे.
Mahatma Gandhi and Islam
Mahatma Gandhi and Islamsakal

Mahatma Gandhi and Islam : इस्लामचा प्रचार अतिशय झपाट्याने व वेगाने झाला. त्यामुळे इस्लाम हा तलवारीच्या जोरावर फैलावला असा कधी कधी आरोप होतो. इस्लाम म्हणजे शांततावादी आणि प्रेमाचा पुरस्कार करणारा धर्म आहे. (Mahatma Gandhi told how Islam religion spread all over the world)

‘‘ला इकराहा फिद्दीन’’ पवित्र कुराण २:२५६ म्हणजे ‘धर्माच्या बाबतीत जबरदस्ती करू नका’, असे पवित्र कुराण स्पष्टपणे बजावत आहे. आणि मग जबरदस्ती आणि तलवार कोठून आली? पुढे पवित्र कुराण असे म्हणते, ‘‘लोकांनी तुमचे म्हणणे मानले नाही, तर तुमचे काम उपदेश करीत राहण्याचे आहे.

’’ पवित्र कुराण १६(८२). लोकांनी इस्लाम ना कबूल केला, तर कोठल्याही तऱ्हेची जबरदस्ती न करता फक्त त्यांना उपदेश करीत राहा, अशी पवित्र कुराण शिकवण देते. अखिल मानवतेचा त्राता “हजरत महंमद पैगंबर’’ ज्यांना पवित्र कुराण ‘दिव्य बोध’ झाला ते पवित्र कुराणच्या आज्ञेचा भंग स्वतःच कसा करतील?

Mahatma Gandhi and Islam
Ramdan 2023 : रमजान पर्वास सुरवात; मुस्लिम बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण!

पवित्र कुराण आज्ञा करते की, ‘‘पवित्र कुराण हे परमेश्वरी सत्य आहे, ज्याला विश्वास ठेवायचा असेल त्याला ठेवू दे. ज्याला नसेल त्यांना न ठेऊ दे.’’ पवित्र कुराण १८(२९).

केवळ संरक्षणाकरिता (For Defence) म्हणून ह. पैगंबरांनी हातात प्रथम शस्त्र धरले आणि तेही वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी त्यांनी शस्त्र धरले म्हणण्यापेक्षा शस्त्र धरणे त्यांना भाग पडले असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल.

Mahatma Gandhi and Islam
Islamic State : 'इस्लाम' वाचवण्यासाठी भारतावर हल्ला करा; दहशतवादी संघटनेचं मुस्लिमांना आवाहन

इस्लाम धर्म कसा प्रस्तृत झाला याचे उत्तर राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पुढील शब्दात दिले आहे. ‘‘ह. पैगंबर यांचे चरित्र वाचल्यानंतर इस्लाम धर्माचा प्रसार तलवारीच्या जोरावर झाला नसून, ह. महंमद पैगंबरांचे पावित्र्य, निरपेक्षवृत्ती, सच्चेपणा, परमेश्वरावर अढळ विश्वास व अखिल मानवजातीसाठी सदाचारी वृत्ती, या त्यांच्या बहुमोल गुणामुळे इस्लाम धर्म फैलावला व फैलावत आहे, अशी माझी पक्की खात्री झाली.’’

इस्लाम धर्मातील या सदाचार वृत्तीचा (अखलाख) आज मुस्लीम बांधवांना विसर पडलाय याचे मात्र दुःख होते.

(लेखक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com