केंद्राकडून ५७६ भारतीय भाषांचे मातृभाषा सर्वेक्षण पूर्णत्वास

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील ५७६ भाषा आणि बोलींच्या ‘फील्ड व्हिडिओग्राफी‘सह मातृभाषा सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले आहे.
Central Government
Central GovernmentSakal
Summary

केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील ५७६ भाषा आणि बोलींच्या ‘फील्ड व्हिडिओग्राफी‘सह मातृभाषा सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले आहे.

नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील ५७६ भाषा आणि बोलींच्या ‘फील्ड व्हिडिओग्राफी‘सह मातृभाषा सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात (एनआयसी) भारतीय भाषांचे मूळ स्वरूप व कालौघात त्यातील बदल यांचे विश्लेषण करण्यासाठी एक सुसज्ज ‘वेब' संग्रहालय स्थापन करण्याच्या योजनेअंतर्गत ही सर्वेक्षण योजना यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.

गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, कोविड-१९ महामारीमुळे मध्यंतरी जनगणनेच्या कामाला व या प्रकल्पालाही ब्रेक लागला होता. आगामी जनगणनेमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासह अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. जनगणनापूर्व ‘मॅपिंग' प्रक्रिये अंतर्गत देशाच्या संपूर्ण भौगोलिक क्षेत्राचे निश्चित क्षेत्र ठरविण्यासाठी राज्ये, केंद्रशासित प्रदेश तसेच जिल्हे, उपजिल्हे, गावे, शहरे आणि महानगरांतील प्रशासकीय कामकाजपध्दती दर्शविणारे नकाशे तयार करणे यांचाही यात समावेश आहे. जनगणनेचे काम करणार्‍या पथकांसाठी ६ लाखांहून अधिक नकाशे तयार करण्यात आले आहेत आणि तेदेखील या प्रकल्पाच्या पोर्टलवर अपलोड केले जात आहेत आणि यंदाच्या जूनपर्यंत मिळालेल्या माहितीवर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब केले जाईल.

या सर्वेक्षणातून जमा झालेल्या माहितीनुसार भारतीय भाषांची साद्यंत माहिती संकलित करण्यासाठी सरकारच्या संबंधित संपादकांकडून काम सुरू आहे असे सांगण्यात आले. २०२१-२२ च्या या अहवालानुसार भारतीय मातृभाषा सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत झारखंडमधील बोलीभाषांच्या सर्वेक्षमाचे काम पूर्ण झाले असून हिमाचल प्रदेशाच्या भाषांचे काम पूर्णत्वाकडे आहे. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशाबाबतचे भाषक सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. भारतीय मातृभाषांचा व्हिडिओग्राफी केलेली समग्र माहिती (डेटा) संग्रहित करण्याच्या उद्देशाने हे सर्वेक्षण एका वेगळ्या सर्व्हरवर अपलोड केले जाणार आहे. या संदर्भातील मॅपिंग अॅपच्या वापराबाबत सूचना पुस्तिका इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये तयार करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच मातृभाषांचा 'स्पीच डेटा' गोळा करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ एनआयसीच्या सर्व्हर'वर शेअर केला जाईल असेही अहवालात म्हटले आहे.

या प्रकल्पांतर्गत जमा झालेली भारतीय मातृभाषांबाबतची समग्र माहिती सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या वेगवान अंमलबजावणीसाठीही उपयुक्त ठरू शकते.

- अन्वर अहमद खान (भाषा तज्ज्ञ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com