स्मार्ट टीव्ही हॅक करून पती-पत्नीचा काढला 'तो' व्हिडीओ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

हॅकर्सनी आता बेडरूमध्ये घुसघोरी केल्याची घटना समोर आली आहे. पती-पत्नीचा नको त्या अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे.

नवी दिल्लीः देशभरात सायबर क्राईमच्या विविध घटना घडत आहेत. सायबर क्राईमच्या माध्यमातून पैशांवर डल्ला मारला जात होता. पण, हॅकर्सनी आता बेडरूमध्ये घुसघोरी केल्याची घटना समोर आली आहे. पती-पत्नीचा नको त्या अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे.

गुजरातमध्ये हॅकर्सनी स्मार्ट टीव्ही हॅक केल्यानंतर पती-पत्नीचा खासगी व्हिडीओ इंटरनेटवर अपलोड केला होता. दांपत्याने तो व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला. सायबर क्राईम विभागाकडे त्यांनी धाव घेतली आहे. खासदार अमर साबळे यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. याप्रकरणी हॅकर्सविरोधात कडक कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्यसभेत बोलताना साबळे म्हणाले, 'देशातील सर्व दांपत्याच्या खासगी क्षणांच्या सुरक्षेकडे मी लक्ष वेधू इच्छितो. तंत्रज्ञानामुळे सुरक्षेला धोका असून सायबर सुरक्षेची गरज आहे. जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि इंटरनेटमध्ये दिवसेंदिवस नवीन शोध लागत आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा फायदा आहे तसा धोकाही आहे. बेडरुरममध्ये स्मार्ट टीव्ही असणे धोकादायक आहे. हॅकर्स आता आपल्या बेडरुममध्ये पोहोचले आहेत. सुरतमध्ये अशी दोन प्रकरणं समोर आली आहेत. त्यांनी स्मार्ट टीव्ही हॅक करुन पती-पत्नीचा व्हिडीओ बनवला. दांपत्याने व्हिडीओ पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. हॅकर्सनी कोणत्याही सिस्टमविना हे केले आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, कारवाई केली पाहिजे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mp amar sable raise smart tv hack issue rajya sabha