

MP Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये जागा वाटपांमध्ये भाजपचा चांगलाच कस लागला आहे. भाजपने तिकीट वाटपात मोठे फेरबदल केले आहेत. एकूण २३० जागांपैकी १३६ जागांसाठी भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
दरम्यान काल (मंगळवार) दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपने उर्वरित ९४ विधानसभा जागांवर चर्चा केली. उर्वरित सर्व जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही बैठक भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी सहा तास चालली.
नड्डा यांच्याशिवाय या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप संघटन सरचिटणीस बीएल संतोष, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा, केंद्रीय मंत्री व राज्य प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैशवान यांचा समावेश होता.
९४ पैकी यामध्ये ७१ आमदारांच्या (६६ भाजप, सपा-बसपा प्रत्येकी एक, दोन अपक्ष आमदार, भाजपला पाठिंबा देणारे शिंदे समर्थक आमदार) जागांवर चर्चा झाली. याशिवाय हरलेल्या २३ जागांवर चर्चा झाली. भाजपच्या उमेदवारांची पाचवी यादी लवकरच येऊ शकते. भाजपच्या उमेदवारांची पुढील यादीत अनेकांची तिकीट कापल्या जाणार आहेत किंवा जाहा बदलण्यात येणार आहे.
मध्य प्रदेशातील सर्व २३० विधानसभा जागांसाठी १७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीला आता महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. २१ ऑक्टोबर रोजी नामांकन अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार व्यूहरचना तयार केली आहे. यावेळी पक्षाने विधानसभा निवडणुकीत तीन केंद्रीय मंत्र्यांसह सात खासदारांना उमेदवारी दिली आहे. (Latest Marathi News)
याशिवाय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह २५ मंत्र्यांना तिकिटे देण्यात आली आहेत. सध्या आठ मंत्र्यांची तिकिटे रखडली आहेत. मंत्री यशोधरा राजे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.