MP Assembly Election: अखेरच्या टप्प्यात दिग्गज मैदानात; पंतप्रधान मोदी, शहा, राहुल गांधी, खर्गे यांच्या सभा रोडशो

MP Assembly Election
MP Assembly Electionesakal
Updated on

MP Assembly Election : मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस असल्याने भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा झंझावात पाहायला मिळणार आहे.

पंतप्रधान मोदी आज दोन प्रचार सभा घेत इंदोरमध्ये रोडशो करणार आहेत तर कांग्रेसचे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे प्रचारसभा घेणार आहेत. (mp assembly election PM Modi Shah Rahul Gandhi Kharge meeting roadshow political news)

तर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंदीय मंत्री अमित शहा, ज्योतिरादित्य सिंधिया, आणि काँग्रेसचे कमलनाथ, दिग्विजय सिंह हेही राज्य पिंजून काढत प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आपापली ताकद लावत आहेत.

मध्यप्रदेश विधानसभेसाठी 17 ला मतदान होत आहे. प्रचारासाठी अखेरचे दोन दिवस आहेत. या दोन दिवसात राज्यात प्रचाराचा जोर वाढणार आहे. काटे की टक्कर असल्याने भाजप आणि काँग्रेसचे दिग्गज पूर्ण ताकदीने प्रचारात उतरले आहेत.

MP Assembly Election
MP Assembly Election: भाजपच्या बालेकिल्ल्यात 'काटे की टक्कर'! पंतप्रधान मोदींचा उद्या इंदूरमध्ये 'रोड-शो'

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बैतुल, शाजापूर येथे प्रचारसभा घेणार असून संध्याकाळी इंदोरमध्ये रोडशो करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा हे देखील दोन दिवसांपासून राज्यात प्रचारसभा घेत काँग्रेस वर टीकेची झोड उठविली आहे. तर ज्योतिरादित्य सिंधिया हेही राज्यात तळ ठोकून प्रचारसभा घेत आहेत.

काँग्रेसनेही भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. भ्रष्टाचार आणि सामाजिक मुद्दे मांडत काँग्रेस नेते मतदारांसमोर जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल भोपाळमध्ये केलेल्या रोडशोमुळे काँग्रेसला जोश आला आहे. राहुल गांधी आज विदिशा, शोजपुरमध्ये प्रचारसभा घेत आहेत तर मल्लिकार्जुन खर्गे हेही अनेकठिकाणी प्रचारसभा घेणार आहे.अखेरच्या दिवशीही दोन्ही पक्षाकडून जोर लावला जाणार आहे.

MP Assembly Election
MP Assembly Elections: रेवड्या बांट-बांट के कुछ नहीं होगा...! काँग्रेसचे सामाजिक मुद्दे मतदारांना भावताहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com